मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना


- महाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार
- पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-६७
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारी व पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिक स्वरूप देणारी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाअत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. महाआयटीकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे सुरु असून, हे काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.
राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारी ही योजना राज्याच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणारी ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील युवावर्गासह शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, योजनेची अंमलबजावणी वेळेवर व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया -
लाभार्थ्यांना घरातूनच सहज अर्ज करता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाआयटीकडे विशेष पोर्टल निर्मितीचे काम सोपविण्यात आले आहे. महाआयटीची तांत्रिक टीम हे पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करतआहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच, योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फतलवकरच जारी करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
माहितीसाठी १९६२ वर संपर्क साधा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनीया टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी. असे डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




