भरधाव दुचाकीची धडक : पादचारी ठार, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी–आमगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ जून रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी देवरी पोलिसांनी ११ जून रोजी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृताचे नाव अकबर शौकत अली सय्यद (५५, रा. देवरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते देवरी येथून डवकी गावाकडे पायी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वर आमगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात अकबर सय्यद गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




