महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर : नागरिकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर न्यायालयाच्या वतीने १४ जुलै रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध कायदेशीर बाबी, हक्क व कर्तव्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कायदेशीर माहिती असलेली पत्रकेही उपस्थितांना वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश सोनिया साळवेश्वरकर उपस्थित होत्या. यावेळी माजी बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. आय. आर. सय्यद, ॲड. मेघा भाले, ॲड बालाजी विधाते, ॲड राजेश लिंगे आणि ॲड बंडू खणके यांनी विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन करत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. न्यायालयीन प्रक्रिया, मोफत कायदेविषयक मदत, नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे पालन याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे अधीक्षक खरतड, उत्तम चांदेकर, शिवकरण राऊत आणि भास्कर वेले यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला बल्लारपूर शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. उपस्थितांनी अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos