लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण : आष्टी येथील डॉक्टर अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३० वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील एका ३२ वर्षीय डॉक्टरविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी डॉक्टरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिजन प्रधान सरकार (वय ३२, रा. आष्टी, ता. चामोर्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
नागपूर व आष्टी येथे अत्याचार मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय तरुणी ही मूळची गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी डॉक्टर बिजन सरकार याने पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाचा गैरफायदा घेत आरोपीने नागपूर तसेच आष्टी येथील रुग्णालयात तरुणीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
लग्नाला नकार दिल्याने गुन्हा दाखल -
पीडित तरुणीने जेव्हा डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपी बिजन सरकार याने तिला लग्न करण्यास साफ नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने गडचिरोली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
तरुणीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर १२ जून रोजी आरोपी डॉक्टर बिजन सरकार याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




