आसोलामेंढा नहरात दोन युवकांचा बुडून मृत्यु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : 
तालुक्यातील पाथरी ते पालेबारसा रोड वरील आसोलामेंढा नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. सोनू पितांबर सोरदे (२३) रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे (२०) रा.पाथरी जि. चंद्र्पुर असे मृतक यवकाची नावे आहेत. 
पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या क्षेत्रात असोलामेंढा तलाव तसेच नहरावर पोहण्यास बंदी आहे. त्या दृष्टीने पाथरी चे ठाणेदार बन्सोड यांनी सुरक्षा ही लावली मात्र याच असोलामेंढा नहराचा पालेबारसा परिसरातील ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सोनू पितांबर सोरदे (२३) रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे (२०) रा.पाथरी हे गेले होते त्यात ते बुडाले. या संदर्भात माहिती होताच पाथरीचे ठाणेदार बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात बुडालेल्या युवकांना बाहेर काढण्याचे काम काम करण्यात आले  काही वेळानंतर त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना बाहेर काढताच प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी रायन मृत घोषित केले. पुढील तपस पाथरी पोलीस करीत असून पाथरी येथील युवक सुरज नेवारे हा त्या बुडत्या युवकाला वाचविण्यासाठी नहरात उडी घेतला असे बोलल्या जात आहे .  Print


News - Chandrapur | Posted : 2021-08-15
Related Photos