पोक्सो प्रकरणातील आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल पोक्सो प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा व सत्र न्यायालय-३, चंद्रपूर यांनी दिला.
रामनगर पोलीस स्टेशन येथे वर्ष २०२२ मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा क्रमांक ३९३/२०२२ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात २१ वर्षीय आरोपीविरुद्ध सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरविले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ मा. पी. एस. गुप्ता यांनी आरोपीस २० वर्षे सक्त कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. हा निकाल १३ मे २०२६ रोजी देण्यात आला.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. आसीफ शेख यांनी कामकाज पाहिले. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी केला असून न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार वेदनाथ करंचे यांनी सहकार्य केले.
या निकालामुळे अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा देण्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




