रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात : सर्व १५ जणांचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : रशियन लष्करी विमानाचा अपघात (Plane Crash) झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे.
रशियन लष्करी विमान कोसळून अपघात -
रशियन लष्कराचे IL-७६ विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
विमानातील सर्व १५ कर्मचारी जागीच ठार -
रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लष्करी मालवाहू विमानाला आग लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात अपघात झाला. मंगळवारी ही घटना घडली. रशियन लष्करी मालवाहू IL-७६ विमान जमिनीच्या दिशेने उतरत असताना त्याच्या एका इंजिनला आग लागली आणि यानंतर विमान कोसळले, अशी माहिती द मॉस्को टाईम्सने दिली आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
News - World