महत्वाच्या बातम्या

 २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद : अन्न व औषध प्रशासनातर्फे रुग्णांसाठी संपर्क क्रमांक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेने ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार,२० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) व्यापक उपाययोजना केल्या आहेत.

प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या मुख्य उपाययोजना व कारवाई 

औषध विक्रेत्यांसोबत बैठक: अन्न व औषध प्रशासनाने १४ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. व्यापक जनहित लक्षात घेऊन या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

वैयक्तिक स्तरावर संपर्क: प्रशासनातर्फे औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून संप मागे घेण्यासाठी व दुकाने सुरू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार: संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून काही औषध दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना संघटनेला देण्यात आल्या आहेत. संघटनेने याला सहमती दर्शवली असून तालुकानिहाय संपर्क व्यक्तींची यादी प्रशासनाकडे सादर केली आहे.

रुग्णांसाठी महत्त्वाचे आवाहन (आणीबाणीच्या प्रसंगी संपर्क):

आणीबाणीच्या स्थितीत औषधांची अत्यंत गरज भासल्यास रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ खालील

अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा -

शहनाज ताजी (सहायक आयुक्त - औषधे): ९८९०५५६७६६८
मोनिका वि. धवड (औषध निरीक्षक): ९८८१६८०४१८

सर्व नागरिकांनी घाबरून न जाता आणीबाणीच्या प्रसंगी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos