माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पुसूकपल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उदघाटन
- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : पुसुकपल्ली येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उदघाटनीय भाषणात राजे म्हणाले की, युवा हेच भारताचे भविष्य आहेत. युवकांना शिक्षणासोबत खेळ आवश्यक आहे. खेळ हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे. आमदार असो किंवा नसो खेळासाठी केव्हाही मदत व सहकार्य करण्यास तयार आहो, असे प्रतिपादन अम्ब्रिशराव आत्राम यांनी उदघाटनीय भाषणातून केले.
पुढे म्हणाले की, पुसुकपल्ली गावासाठी या आधीही शुद्ध जल सेवा केंद्रासाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आणि पुढेही मदत लागली तर करेन असेही ते यावेळी म्हणाले. टुर्नामेंटमध्ये सहभागी स्पर्धकांना यश संपादन करण्याकरिता शुभेच्छा दिले. यावेळी त्यांनी मैदानात क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूसोबत आनंदात समावेश घेतले.
यावेळी रवि नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, अमोल गुडेल्लीवार भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव, सौ. शेवंता प्रमोद भोयर सदस्या ग्रामपंचायत नागेपल्ली, पोशालू चुदरी भाजपा महामंत्री अहेरी, रामदास चौदरी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, मल्लेश चौधरी, प्रमोद भोयर, सतीश येल्लूर, महेश येल्लूर, राकेश काटेल, राकेश कुळमेथे सदस्य ग्रामपंचायत नागेपल्ली, विनोद जिल्लेवार भाजपा सोशल मीडिया संयोजक अहेरी विधानसभा क्षेत्र, विक्की तोडसाम, गुड्डू ठाकरे, नितीन तोर्रेम हे मान्यवर उपस्थित होते.
News - Gadchiroli