महत्वाच्या बातम्या

 वैनगंगा नदीला पूरस्थितीचा इशारा : गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतशिवार पुन्हा हिरवेगार झाले आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून नदी व धरण पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरण गोसीखुर्द धरण प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत धरणाचे सर्व ३३ दरवाजे ०.५ मीटरने उघडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या धरणातून तब्बल ३७०६.९८ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात तसेच धापेवाडा प्रकल्पातून धापेवाडा प्रकल्प सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीची पातळी आणखी वाढली आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नदीची पातळी वाढल्याची नोंद झाली आहे.सतत वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेता परिस्थिती कायम राहिल्यास गोसीखुर्द धरणाचे दरवाजे ०.५ मीटरपेक्षा अधिक उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले -
दरम्यान, पावसामुळे पुजारीटोला धरणाचे पुजारीटोला धरण चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणात सध्या ८०.०१ टक्के पाणीसाठा असून येथून ८६ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दुसरीकडे बावनथडी प्रकल्पात बावनथडी प्रकल्प केवळ १४.३९ टक्के तर संजय सरोवर प्रकल्पात संजय सरोवर प्रकल्प १५.९० टक्के इतकाच पाणीसाठा असल्याने या दोन्ही धरणांचे दरवाजे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.

एकूणच जिल्ह्यातील जलस्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास वैनगंगा खोऱ्यातील परिस्थिती आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos