बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : ३ जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / बुलडाणा : बुलडाण्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात ३ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारला सकाळी हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर झाला.
माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर तालसवाडानजीक पुलावर टिप्पर व आयशरची भीषण धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, यात मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील ३ जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.
मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील आयशर हा विटांचा माल घेवून दसरखेडहून मलकापुरकडे जात होते. दरम्यान आशयरला टिप्पर ने दसरखेड नजीक असलेल्या तालसवाडा पुलाजवळ भीषण धडक दिली. या धडकेत आयशच्या समोरच्या भागाचा अक्षरश चुराडा झाला. यामध्ये राजू रतन चव्हाण, जीवन सुरेश राठोड व सुनिल ओंकार राठोड मोहेगाव यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.
News - Rajy