वर्धा शहर व शहरालगत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

- म्हसाळा येथील जनसंवाद कार्यक्रम
- १०० च्यावर तक्रारी व निवेदन प्राप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ले-आऊटच्या माध्यमातून विस्तार होत आहे. पुर्वी या ले-आऊटधारकांनी आवश्यक सुविधा निर्माण करुन दिल्या नाही. त्यामुळे परिसरात रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, वीज अशा आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी नागरी सुविधा, जिल्हा नियोजन समितीच्या निधी सोबतच म्हाडाच्या निधीमधून आवश्यक सुविधा निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
म्हसाळा येथे पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला तहसिलदार संदीप पुंडेकर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, विशेष कार्य अधिकारी सुरेश बगळे, म्हसाळाचे माजी उपसरपंच संदेश किटे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार, दिलीप चव्हाण, राजु धमाने, बंटी गोसावी, नितीन डफळे, पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते.
म्हसाळा येथे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देऊन विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. या परिसरातील रस्ता, नाली बांधकामासाठी १ कोटी ७२ लाख ५० लक्ष रुपयाची निधी उपलब्ध करुन कामे पूर्ण करण्यात आली. म्हसाळा टी पॉईट ते सेवाग्राम रस्त्याच्या ५० लक्ष रुपयाच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे सेवाग्राम रस्त्यावरुन थेट म्हसाळा येथे जाणाऱ्या नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार असल्याचे पुढे बोलतांना डॉ.पंकज भोयर म्हणाले.
जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचतगटाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ५० हजाराच्यावर महिला लखपती दिदी झालेल्या आहे. येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महिला बचत भवनाच्या माध्यमातून महिलांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. यावेळी म्हसाळा येथील ग्रामस्थांकडून रस्ता बांधकाम करणे, नाली बांधकाम करणे, घरकुल मागणी तसेच जमीनीचे पट्टे मिळण्याबाबत १०० निवदेन प्राप्त झाली. या निवेदनावर लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे ग्रामस्थांना त्यांनी आश्वस्त केले. तत्पूवी म्हसाळा टी पॉईट ते सेवाग्राम रोड येथील रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.




Petrol Price




