महत्वाच्या बातम्या

 गोंदिया : गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ अपघातात युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळील अप लाईनवरील किमी क्रमांक १०१५-११ येथे शनिवारी ९ रात्री सुमारे ९ वाजेपूर्वी रेल्वे अपघातात अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा अनोळखी युवक ठार झाला.

प्राथमिक तपासात मृताच्या उजव्या हातावर मनीष बेले असे नाव गोंदले असल्याचे आढळले आहे. सदर प्रकरणाची नोंद गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सहायक फौजदार रमेश भालेराव यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मृतकाची ओळख पटवण्यासाठी आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक तपासही सुरू आहे.

रेल्वे पोलिसांनी नागरिकांना अपघातस्थळाजवळ सावधगिरी बाळगण्याचे आणि रेल्वे ट्रॅकवर येण्यापासून परावृत्त राहण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos