राष्ट्रीय सेवा योजना मधील श्रमसंस्कार हे आयुष्यभर अनुभवाची शिदोरी
- डी. एन. चापले सदस्य श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीचे सदस्य डी.एन.चापले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना, स्वयंसेवकांनी शिबिरामध्ये शिकलेले कलागुण आणि श्रमगुण सोबत घेऊन आयुष्यभर जपायचे असते असे प्रतिपादन केले.
उद्घाटनपर कार्यक्रमाचे उद्घाटक शेषराव कोहळे, उपसरपंच ग्रामपंचायत सोनापूर हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शरद पाटील ब्राह्मणवाडे, सदस्य शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली, प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री के.डी.डी.महाविद्यालय चामोर्शी, राम बारसागडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सोनापूर, सौ.चंदा घोंगडे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सोनापूर, एच.डब्ल्यू.कामडी, मुख्याध्यापक राजीव गांधी विद्यालय सोनापूर, तसेच सोनापूर ग्राम पंचायत चे सदस्य अनिल उंदिरवाडे, उत्तम कोवे, सौ.सविताताई कुनघाडकर, सौ.दिपाली मेश्राम, डॉ.गेडाम, पशू वैद्यकिय अधिकारी जामगीरी, तसेच जि.प.उच्च प्राथ. शाळा सोनापूरचे शिक्षकवृंद सर्वश्री ए.एस.दडमल, डी.जी.उके, एस.एम.पोहरकर, पी.एस.सावरकर, यु.एल.बोडावार, डि.बी.सेडमाके, टि.बी. रोहणकर, एस.जी.जुमनाके, डि.यु.पेंदोर, एस.के.हेडो, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंत कोहळे, शालिक कुरखेडे, नारायण कन्नाके, प्रेमदास गेडाम, अरुण कुनघाडकर, पुंजाराम मडावी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक शेषरावजी कोहळे उपसरपंच ग्रामपंचायत सोनापूर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजसेवेसाठी सदैव तत्पर असावे व जीवनात बदल घडवून आणण्यासाठी शिबिरातील उपक्रमातून बोध घ्यावा असे प्रतिपादन केले. तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोलीचे सदस्य शरद पाटील ब्राम्हणवाडे यांनी शिबीरार्थ्यांना आपले पाल्य समजून गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
व ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता या शिबिराचे आयोजन केले आहे, जेणेकरून श्रमदानाचे महत्व विद्यार्थांना कळेल, असे वक्तव्य केले. आणि प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडवण्याची कार्यशाळा असते, आणि त्यातूनच विद्यार्थी घडत असतो. असे प्रतिपादन केले. व शिबीरार्थी स्वयंसेवकांवर चांगले संस्कार व सहकार्य करण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.डी.बावणे यांनी केले, तर संचालन प्रा. वंदना थुटे, तर आभार प्रा.मीनल गाजलवार यांनी मानले.
या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.आर.एम. झाडे, डॉ.भूषण आंबेकर, प्रा.दीपक बाबनवाडे प्रा.अरुण कोडापे, प्रा.संकेत राऊत, प्रा.वैशाली कावळे, प्रा.स्नेहा उसेंडी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रवी कराडे तसेच रा.से. यो.स्वयंसेवक, जि. प. उच्च प्राथ. शाळा व राजीव गांधी विद्यालय सोनापूरचे विद्यार्थी व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli