महत्वाच्या बातम्या

 महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे व पिक प्रात्यक्षिक वितरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया, सन २०२६-२७ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक या घटकासाठी महाडीबीटी प्रणालीवर शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, गळीतधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांच्या क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

खरीप हंगाम २०२६-२७ करिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी विंडो उपलब्ध करण्यात आलेली असून, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिती म. हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर स्वतः अर्ज करावा किंवा जवळच्या सेतू केंद्र / सीएससी केंद्र /सहाय्यक कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. अर्ज करताना फार्मर आय.डी, आधार क्रमांक, सातबारा उतारा, बँक खाते तपशील व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.

जिल्ह्यातील सर्व कृषि अधिकारी, कर्मचारी व विस्तार यंत्रणेमार्फत या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी/ संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालय जिल्हा- गडचिरोली. यांच्याशी संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos