महत्वाच्या बातम्या

 ॲट्रासिटीबाबत कार्यशाळा लवकरच : जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती होण्यासाठी  या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला सरकारी अभियोक्ता, पोलीस अधिकारी व समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत घडलेल्या गुन्ह्याची माहिती सादर करण्यात आली. एकूण २ हजार १७७ गुन्हे घडले असून त्यात शहरी ७१५ तर ग्रामीण १ हजार ४६२ गुन्ह्यांचा समावेश आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एकूण ७८ गुन्हे घडले असून शहर ३५ व ग्रामीण ४३ गुन्ह्याचा समावेश आहे. यात अनुसूचित जातीचे ६३ व अनुसूचित जमातीचे १५ गुन्हे आहेत. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरअखेर १ कोटी ४ लाख ५० हजाराचे अर्थसहाय्य प्रलंबित प्रकरणासाठी मंजूर असल्याचे सांगण्यात आले.





  Print






News - Nagpur




Related Photos