गडचिरोली जिल्ह्यात ७८८ तपासण्यांपैकी २ रुग्ण आढळले कोरोना बाधित तर २ कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात 788 कोरोना तपासण्यांपैकी  नविन कोरोनाबाधित 2 तर  2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30748 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29990 आहे. तसेच सद्या 12 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.58 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
नविन कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली 01, मुलचेरा 01, कोरोनामुक्त झालेल्या 02 रुग्णामध्ये भामरागड तालुक्यातील 02, जणांचा समावेश आहे.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-09-14






Related Photos