कब्रस्तानातून अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
विचाराच्या पलिकडची घटना, ज्याने तुमचे मन फक्त सुन्नच होणार नाही तर बधिर पण होईल. पाकिस्तानातील सिंधमध्ये 13 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना गालबोट लावणारी घटना घडली. सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावातील स्मशानभूमीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आली. एवढेच नव्हे तर त्या मुलीच्या मृतदेहावर बलात्कार सारखा किळसवाणा प्रकार केला. 
तापामुळे या 14 वर्षीय मुलीने आपला जीव गमावला. जवळच्या कब्रस्तानात अगदी परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला. मात्र त्याच रात्री एका विकृत व्यक्तीने मुलीचा मृतदेह कब्रमधून बाहेर काढला. तो मृतदेह कब्रस्तानाबाहेर अर्धा किमी घेऊन एका झाडीत गेला. त्या मृतदेहावर त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्या मृतदेहाला तसेच झाडीत सोडून दिले. रफीक चांडीओ असे त्या आरोपीचे नाव आहे. जो त्या परिसरातील कुख्यात गुंडा होता. 
सकाळी काही मुलांच त्या मुलीच्या मृतदेहाकडे लक्ष गेले. मुलांनी तात्काळ हा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. मुलीचे वडिल आणि गावातील काही लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी देखील त्या परिसराचा ताबा घेतला. मुलीचा शव एका झाडीत सापडला तर त्या मुलीच्या शरीरावर कफन देखील गायब होते. एवढेच नव्हे तर तिचे कपडे देखील अस्ताव्यस्त होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह रूग्णालयात पाठवला. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.   Print


News - Rajy | Posted : 2021-08-21
Related Photos