माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील उमानुर येथील भव्य व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन जय पेरसापेन क्रिडा मंडळ उमानुर द्वारे आयोजित केली असता. या व्हॉलीबाल सामन्याचे उद्धघाटन आविस काँग्रेसनेते व अहेरी विधानसभा प्रभारी तथा माजी जि.प. अध्यक्ष कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षा डॉ. निसार (पप्पू) हकीम- जेष्ठ नेते नामदेव आत्राम होते.
यावेळी उदघाटन प्रसंगी इंदारामचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, ॲड. हनमंतू अकुदरी, देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे, राजाराम ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, सामजिक कार्यकर्ते नामदेव पेंदाम, उमानुर माजी सरपंच तारक्का आसाम, गोविंदगावचे सरपंच शंकरी पोरतेट, जिमलगट्टा ग्रामपंचायतचे सदस्य वनिता वेलादी, आविस काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मीनारायण अट्टेला, आविस काँग्रेस कार्यकर्ते शामराव गावडे, चिरंजीव गांधरला, विघ्नेश यादावर, राजू बोरकुट, किशोर सडमेक, जेष्ठ कार्यकर्ते जयराम, सोमेश्वर गेडाम, पोचम संपत, सुधाकर पोरतेट, श्रीनिवास मडावी, रमेश जंगम, विलास सलफला, नारायण गांधारला, शंकर गावडे, अनिल आलामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli