आजचे दिनविशेष


२२ मे महत्वाच्या घटना
१७६२ : स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.
१९०६ : राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
१९१५ : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.
१९२७ : चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.
१९४२ : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.
१९६० : ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
१९६१ : हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
१९७२ : सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
१९८७ : मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.
२००४ : भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.
२०१५ : आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
२०१२ : टोकियो स्कायट्री - लोकांसाठी खुले झाले. हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे (६३४ मीटर), आणि बुर्ज खलिफा (८२९.८ मीटर) नंतर पृथ्वीवरील दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे.
२०१० : एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 - ह्या बोईंग 737 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात, त्यात १६६ लोकांपैकी १५८ लोकांचे निधन.
२२ मे जन्म
१४०८ : हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)
१७७२ : समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
१७८३ : विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)
१८१३ : जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)
१८५९ : स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)
१८७१ : संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)
१९०५ : इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९५६)
१९०७ : ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै १९८९)
१९४० : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
१९४८ : भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक नेदुमुदी वेणू यांचा जन्म.
१९५९ : भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.
१९८४ : फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.
१९८७ : सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म.
१९५४ : जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता - नोबेल पारितोषिक विजेते शुजी नाकामुरा यांचा जन्म
१९४३ : उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक विजेते बेट्टी विल्यम्स यांचा जन्म (मृत्यू : १७ मार्च २०२०)
१९२७ : अमेरिकन कादंबरीकार, द पॅरिस रिव्ह्यूचे सहसंस्थापक पीटर मॅथिसेन यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल २०१४)
१९२७ : हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते जॉर्ज अँड्र्यू ओलाह यांचा जन्म (मृत्यू : ८ मार्च २०१७)
१९१२ : इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते हर्बर्ट सी. ब्राउन यांचा जन्म (मृत्यू : १९ डिसेंबर २००४)
१८७८ : भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान गुलाम मोहम्मद बक्श बट यांचा जन्म (मृत्यू : २३ मे १९६०)
२२ मे मृत्यू
१५४५ : भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.
१८०२ : अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१)
१८८५ : जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८०२)
१९९१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
१९९५ : चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.
१९९८ : लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)
१९९७ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते अल्फ्रेड हर्शे यांचे निधन (जन्म: ४ डिसेंबर १९०८)
१९८३ : बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते अल्बर्ट क्लॉड यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १८९९)
१०६८ : जपानचे सम्राट गो-रिझेई यांचे निधन (जन्म: २८ ऑगस्ट १०२५)
News - todayspecialdays




Petrol Price




