रत्नापुरमध्ये माजी सरपंच रामचंद्र गहाणे यांचा समाजसेवी उपक्रम : पाण्यासाठी बोरवेल ७ वर्षांपासून खुला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रत्नापुर गावातील माजी सरपंच रामचंद्र गहाणे यांनी गावातील पाण्याच्या तुटवड्याशी झुंज देत, स्वतःच्या वाड्यात मारलेला बोरवेल गावकऱ्यांसाठी पूर्णपणे खुला ठेवला आहे. या बोरवेलमधून गावातील आणि आसपासच्या परिसरातील सामान्य लोकांना आवश्यक तेवढे पाणी विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहे.
रामचंद्र गहाणे यांचा हा समाजस्नेही उपक्रम जवळपास सात वर्षांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या या कामाचे विशेष कौतुक केले आहे. रत्नापुर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी अंदाजे ३५ वर्षांपूर्वी उमा नदीवरील पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. मात्र, सध्या उमा नदी पूर्णतः कोरडी पडल्यामुळे गावात फक्त तीन दिवसांनंतरच पाणी उपलब्ध होते. यावर उपाय म्हणून ‘जल जीवन मिशन’ योजना राबवली गेली, परंतु ती पूर्णपणे उपयुक्त ठरलेली नाही.
गावात सौरऊर्जेवर चालणारे हातपंप बोरवेल उपलब्ध असले तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना पाण्याची तुटवड भासते. अशा परिस्थितीत माजी सरपंच रामचंद्र गहाणे यांनी स्वतःच्या जागेवर मारलेला बोरवेल गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे. त्यांनी हा बोरवेल दोन-तीन महिन्यांपासून नियमितपणे लोकांना पाणी पुरवण्यासाठी खुला ठेवला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाणी हे जिवन आहे, आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अपरंपार उपयोग होतो. रामचंद्र गहाणे यांचे हे उपक्रम गावातील लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहेत.
रामचंद्र गहाणे यांच्या या सातवर्षीय उपक्रमामुळे रत्नापुर आणि परिसरातील पाण्याच्या तुटवडीवर मोठा आघात कमी झाला असून, त्यांची समाजसेवा आज गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




