सिंदेवाही : वासेरा येथे विज पडून अग्नितांडव
- सिंदेवाही व नागभीड़ येथील अग्निशामक दलाने दोन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आणली आटोक्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे काल रात्री ८ :३० वाजता पुरन लांजेवार व प्रकाश लाजेवार यांच्या घरी असलेल्या बैलाच्या गोट्यातील तणीस व शेत कामाच्या साहित्याची अक्षर राखरांगोळी झाली, विज गोठ्यातील बाजुला असलेल्या झाडावर पडल्यामुळे हाणी झाली नाही. घरातील महिलेने बेलाचे दोर कापुन घेत बैलाची सुटका केली. पण आगीने रूद्ररूप घेवून बाजुच्या घराला आग पसरण्याची भिती निर्माण झाली होती. वादळवारा व आग बघता संपुर्ण गाव घटना स्थळी जमा झाले होते.
विज पडुन गेल्यावर पावसाला सुरूवात झाली, पण गोट्यातील तणसीला आग लागल्यावर आग घुपत गेली व सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळे आगीने रूद्ररूप धारण केले. करीता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, यात दोन्ही शेतकन्यांच्या शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आगीची वार्ता तालुका आपत्ती निवारण व्यवस्थापनाला देण्यात आली. तहसिलदार तसेच पो. निरिक्षक यांचा ताफा लागीवर लक्ष ठेवून होते, नगरपंचायत सिंदेवाही येथील अग्निशामक दल वेळेवर पोहचल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. पण वादळ असल्यामुळे कठीण परिस्थीतीचा सामना करावा लागला. गावातील युवक व नागरिक यांनी खुप मोलाचे सहकार्य केले, तणसीच्या ढिगान्याला आकोळीच्या सहायाने खुरपुन तणीस बाजुला करण्यात आली. तरी पण गोठ्यात असलेला लाकुड फाटा जळायला सुरुवात झाली. सिंदेवाही येथील अग्निशामक दल येण्या अगोदर पावसाला सुरूवात झाली पण काही वेळा पुर्तीच पावसाच्या दुषारामुळे जाग विझल्यासारखी झाली पण पुन्हा आगीने खुरपत पेट घेतला म्हणुन सिंदेवाही व नागभिड येथील अग्नि क दलाला पाचारण करण्यात आले. सुरूवातीला सिंदेवाही येथिल अग्निमक दल घटनास्थळी हजर झाले. त्यासाठी युवकांची खुप मदत झाली. रस्ते अरुंद असल्यामुळे गाडी पार्किंग साठी जागा अपुरी पडत होती तरी पण प्रयत्न करून गाडी घटणारथळी पोहचली व आग आटोक्यात करण्यात आली.
सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी हाती घरला होज पाईप
अनेक प्रयत्न करून सुध्दा आग आटोक्यात येत नव्हती म्हणून नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी स्वतः होज पाईप हातात धरून आगीवर पाण्याचा वर्षाव केला, स्वतः अग्निशामक दलाच्या गाडीत बसून ते सिंदेवाही येथुन वासेरा येथे घटनास्थळी हजर झाले. धुर व ज्वाला यांच्या मधोमद उभे राहुन त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत होते. आगीच्या जवळ ते दोन तास उभे होते, संपूर्ण शरीर धुळे व आगीजवळ थांबून थकल्यासारखे झाले होते असे दृष्य क्वचितच बचायला मिळते. समाज कार्य करायचे ते मग कोणत्याही प्रकारे करता येते याची प्रचिती आली.
दोन्ही शेतकन्यांचे अतोनात नुकसान
या नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही शेतकन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोठ्यात ठेवलेल्या शेतीपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे. सोबतच लाकूडफाटा, तणीस, शेड यांचे पण नुकसान झाले आहे डेरी, भोवरी, लाकडी बखर ,नागर, दावे, तणीस इत्यादी नुकसान झाली आहे . शेजारलाच दोन्ही शेतकन्यांचे घर असून खुप मोठे नुकसान टळले. कदाचित घरावर विज पडली असती तर मनुष्य हाणी सुध्दा नाकारता येत नसती. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
News - Chandrapur