पं. सूर्यकांत गायकवाड यांच्या निधनाने भक्ती संगीतातील तपस्वी गमावला : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पं. सूर्यकांत गायकवाड गुरू यांच्या निधनाने शास्त्रीय भक्ती संगीतातील एक दिग्गज तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केले आहेत.
ते पुढे म्हणाले की, पं. सूर्यकांतजी गायकवाड गुरूजी म्हणजे पारंपारिक शास्त्रीय संगीत आणि वारकरी परंपरेतील भक्ती संगीत यांचा मेळ साधणारा अवलिया होता. वारकरी संप्रदायातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून पं. सूर्यकांत गायकवाड गुरू ओळखले जायचे. अर्वाचिन भक्ती संगीताला त्यांच्या कार्याने एक वेगळी उंची लाभली. गुरुजींच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या परिवारजन आणि शिष्यमंडळींना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थनाही त्यांनी केले आहे.
News - Rajy