महत्वाच्या बातम्या

 शासकीय कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी वेळ पाळावी : प्रशासकीय शिस्त आणि सूक्ष्म नियोजनाचे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांचे निर्देश


- गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उत्साहात उद्घाटन; लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचे कोणतेही शासकीय कार्यक्रम आयोजित करताना त्याचे सूक्ष्म नियोजन आधीच पूर्ण झालेले असावे. सर्वसामान्यांचा वेळ अमूल्य असून, अधिकाऱ्यांनी कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि शिस्त आणणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून, नागरिकांना नियोजनाअभावी त्रास झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज येथे दिला.

नगर परिषद नगर भवन, गडचिरोली येथे शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत होते.

या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शेकडो पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

कार्यक्रमादरम्यान भाषणात बोलताना आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रशासकीय कार्यक्षमतेवर विशेष भर दिला. अनेकदा नियोजनाअभावी नागरिकांना ताटकळत राहावे लागते, ही बाब गंभीर असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. शासकीय शिस्त ही केवळ कागदावर न राहता ती कृतीत दिसली पाहिजे. अधिकारी वेळेवर आले तरच जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

या सोहळ्याला भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा प्रदेश सदस्य प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, नगरसेविका साक्षी बोलूवार, नगरसेविका कोमल नैताम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार सागरजी कांबळे, गट विकास अधिकारी अनिकेतजी पाटील व इतर मान्यवर आणि कर्मचारी  उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos