१२ फेब्रुवारीला भाजपा जिल्हा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक


- महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे उपस्थित राहणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, गोविंद सारडा प्रामुख्याने उपस्थित राहून महिला आघाडीचे कार्य वाढविण्याबाबत व इतर विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या बैठकीला भाजपच्या महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा महामंत्री, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका महामंत्री, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत/नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, महामंत्री यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले आहे.
News - Gadchiroli