मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही-लोनवाहीतील अनेक प्रभागातील मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. खरुज सदृश्य जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे सिंदेवाही-लोनवाही नगर पंचयतीच्या परिसरात फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यापासून संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. सिंदेवाही-लोनवाही नगर पंचयतीच्या परिसरात अनेक दिवसांपासून हा प्रकार निदर्शनात येत असून मोकाट कुत्र्यांना अंगावरील केस गळती होऊन संपूर्ण अंगावर जखमा झाल्याचे आढळून येत आहे.
कुत्र्यांच्या अंगावरील जखमामधून रक्त वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. चर्मरोगाची लागण झालेल्या मोकाट कुत्र्यांपासून वयोवृद्ध लोकांना व लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या या संसर्गापासून परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची चिंता सध्या नागरिकांमध्ये वाढली आहे. याकडे नगरपंचयत प्रशासनाने गंभीरपूर्वक लक्ष घालून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मांगणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
News - Chandrapur