महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

कच्च्या मालाच्या दरवाढीने गणेशमूर्ती महागल्या : मूर्तिकारांची लगबग वाढली बातम्या - Chandrapur

कच्च्या मालाच्या दरवाढीने गणेशमूर्ती महागल्या : मूर्तिकारांची लगबग वाढली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गणेशोत्सवाची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, यंदा मात्र वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे मूर्तिकारांसह गणेशभक्तांनाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शाडूची माती, तणस, सजावटीचे साहित्य आणि अन्य आवश्यक साहित्याच्या दरात वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडे आलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत सुरू आहे. पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेली शाडूची माती व अन्य नैसर्गिक साहित्य विविध ठिकाणांहून आणावे लागते. वाहतूक खर्चासह साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्ती तयार करण्याचा एकूण खर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चिखलाने धोकादायक बनला किटाळी मार्ग : तातडीच्या उपाययोजनांसाठी युवासेनेचा इशारा बातम्या - Chandrapur

चिखलाने धोकादायक बनला किटाळी मार्ग : तातडीच्या उपाययोजनांसाठी युवासेनेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : किटाळी चौक ते ईरई नदी पूल तसेच किटाळी चौक ते किटाळी गावादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी युवासेनेने प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यावर साचलेला चिखल अद्याप कायम असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.किटाळी चौक ते ईरई नदी पूल आणि किटाळी चौक ते किटाळी गावादरम्यानचा रस्ता काही काळापासून खराब अवस्थेत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचाल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
प्रभाग क्र. १० मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ट्यूबवेलच्या कामांना प्रारंभ बातम्या - Chandrapur

प्रभाग क्र. १० मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ट्यूबवेलच्या कामांना प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांची पाणीपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन संतोषी माता वार्ड आणि बुद्धनगर वार्ड येथे नवीन ट्यूबवेल बोरिंगच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या कामामुळे परिसरातील नागरिकांना भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, पाणीटंचाईची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या उद्देशाने विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. पाणीपुरवठ्याची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ट्यूबवेलच्या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा अल्का वाढई, नगरसेवक सुमित (गोलू) डोहने...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बनावट पदवी प्रकरणातील दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार बातम्या - Chandrapur

बनावट पदवी प्रकरणातील दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार


- पैसे परत करण्याच्या दबावामुळे आरोपी लपून फिरत होते; रॅकेटमधील आणखी साथीदारांचा शोध सुरूविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी व प्रमाणपत्रे तयार करून ती लाखो रुपयांना विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दुर्गापूर पोलीस दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परिमल गौरकर आणि अक्षय खोबरागडे यांनी आतापर्यंत सुमारे २० ते २५ जणांना बनावट पदव्या विकल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. नोकरी, उच्च शिक्षण, पदोन्नती तसेच अन्य कारणांसाठी संबंधितांनी आरोपींकडून या पदव्या खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.दरम्यान, संबंधित पदव्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर त...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीतील क्रांतिवीरांना ऊर्जानगरात अभिवादन बातम्या - Chandrapur

चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीतील क्रांतिवीरांना ऊर्जानगरात अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीने निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण करीत ऊर्जानगर येथे क्रांतिवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने राष्ट्रसंत ऑगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून चिमूरच्या भूमीत १९४२ मध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. झाड झडले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे या त्यांच्या प्रेरणादायी भजनातून चिमूरकरांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूरवासीयांनी इंग्रजांच्या सत्तेविरोधात पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रिटिशांच्या बंदुका व संगिनींची पर्वा न करता नागरिकांनी स्वातंत्र्याची लढाई तीव्र केली. १६ ते १८ ऑगस्टदरम्यान चिमूरने ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या भरवशावर बातम्या - Chandrapur

बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या भरवशावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असून, कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अनिल देशमुख यांची २० जून रोजी बदली झाली. त्यानंतर सोनवणे यांच्याकडे बल्लारपूरच्या उपअधीक्षकपदाचा प्रभार सोपविण्यात आला. मात्र, सोनवणे यांची मुख्य जबाबदारी राजुरा येथे असल्याने बल्लारपूर कार्यालयातील कामकाजाकडे अपेक्षित लक्ष देता येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी, नकाशे, अभिलेखातील नोंदी, फेरफार यासह नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची क...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
३० वर्षांनी पुन्हा जुळल्या जुन्या आठवणींच्या तार : गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बातम्या - Chandrapur

३० वर्षांनी पुन्हा जुळल्या जुन्या आठवणींच्या तार : गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस    तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गांधी विद्यालय, डेपो विभाग, बल्लारपूर येथील सन १९९७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी, ३० ऑगस्ट रोजी बल्लारपूर येथील विश्रामगृहात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध पुन्हा घट्ट केले. स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम सुरू असतानाच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अचानक विश्रामगृहात आगमन झाले. अनपेक्षितपणे आमदार मुनगंटीवार उपस्थित राहिल्याने माजी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, दहावीचे मित्र हे आयुष्यभराचे मित्र असतात. पद आणि पैसा आज आहे, उद्या नसेल; मात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
प्रारूप मतदार यादी जाहीर : २ लाख ७० हजार १५३ अनकाऊंटेबल मतदारांची पडताळणी बातम्या - Chandrapur

प्रारूप मतदार यादी जाहीर : २ लाख ७० हजार १५३ अनकाऊंटेबल मतदारांची पडताळणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस    प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मतदार यादी आणि पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मतदान केंद्रांचे अंतिम सुसूत्रीकरण, मतदारांची संख्या, मतदार यादीत नाव नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती व स्थलांतरासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, आयोगाने मान्य केलेली कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.एसआयआरमधील मागील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील, आजी-आजोबांच्या तपशिलाशी जुळवणी न झाल्यास तसेच नवीन नोंदणीच्या वेळी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीला पाच वर्षांचा सक्त कारावास बातम्या - Chandrapur

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीला पाच वर्षांचा सक्त कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस    प्रतिनिधी / चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावण्यात आला. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला रुग्णालयातील काम आटोपून घरी परत जात होती. दरम्यान, स्वागत मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात आरोपी पतीने तिला घरी चलण्यास सांगितले. मात्र, तिने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर सत्तूरने हल्ला केला. डोक्यावर, हातावर आणि पायावर दोन-तीन वेळा वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.या घटनेनंतर महिलेच्या फिर्यादीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८/२०२३ अन्वय...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भरधाव आयशर ट्रक घरावर आदळल : हडस्ती येथील घटना  बातम्या - Chandrapur

भरधाव आयशर ट्रक घरावर आदळल : हडस्ती येथील घटना 


- चालक-कंडक्टर वाहन सोडून पसारविदर्भ न्यूज एक्सप्रेस   तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेला आयशर ट्रक घरावर आदळून बाथरूम व सायवनाचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथे घडली. या घटनेत घरमालकाचे सुमारे ६० हजार रुपये, तर दुकानाचे सिमेंटचे पोल व टिनाचे शेड तुटून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक व कंडक्टर वाहन सोडून पसार झाले. प्राप्त माहितीनुसार, संजय शालिक आंबिलकर (४२) हे सोमवारी पहाटे ते घरात झोपले असताना अचानक मोठा आवाज झाला. आवाजाने जागे होऊन घराबाहेर येऊन पाहिले असता CG 07 DC 1995 क्रमांकाचा आयशर ट्रक त्यांच्या घराच्या बाथरूम व सायवनावर आदळलेला दिसून आला.तसेच या ट्रकने रविंद्र सखाराम बोरकर यांच्या दुकानाचे सिमेंटचे पोल व टिनाचे शेड तोडले. आंबिलकर यांनी ट्रक चा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →