राज्यात लवकरच शिक्षक भरती : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात शिक्षण विभागात शिक्षक भरती होणार आहे. ट्विट   करुन वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
राज्यातल्या शिक्षण विभागात एकूण २ हजार ६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३ हजार ९०२  उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत घोषणा केली की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५९१  खाजगी व्यवस्थापनाच्या २ हजार ६२ रिक्त पदांसाठी १५ हजार १२३ पसंतीक्रमावर ३ हजार ९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे.   Print


News - Rajy | Posted : 2021-09-03
Related Photos