महत्वाच्या बातम्या

 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, विभागामार्फत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ९ सप्टेबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेवा परमोधर्म या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकापर्यंत सेवा पोहोचविण्यांच्या अविरत प्रयत्न केला आहे.

त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे मार्फत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे.

सदर अभियान शासकीय/अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुलाचे-मुलींचे वस्तीगृह, नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा, सैनिकी शाळा तसेच जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावामध्ये प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे या सेवा संकल्प अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेले विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या सेवा संकल्प अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेले विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये विशेषत:  विकसित भारत २०४७ संकल्पनेवर  आधारित चित्रकला व वकृत्व स्पर्धा, नमो सेवागाथा कार्यक्रमातंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना, पालकांना, आदिवासी नागरिकांना देण्यात येणार आहे.

सेवा माझे योगदान अंतर्गत आश्रमशाळा, वस्तीगृहातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन व जबाबदार नागरिकांत्वाचीची जाणीव निर्माण करण्यासाठी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, रस्ता सुरक्षा जनजागृती, सायबर सुरक्षा जनजागृती, आदिवासी स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक, मतदान जागृती व नोंदणी, व्यसनमुक्त भारत जनजागृती, पोषण व ॲनिमिया जनजागृती, करिअर मार्गदर्शन सत्रे, डिजिटल साक्षरता, पर्यावरण संवर्धन, बालसंरक्षण जनजागृती, वस्तीगृहामध्ये उद्योजकता कार्यक्रम इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहे.

सेवा सेतू अभियानातंर्गत महसूल विभागामार्फत तालुका स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये आदिवासी विकास योजनांच्या माहितीच्या स्टॉल लावून आदिवासी नागरिकांना योजनांची माहिती, ऑनलाईन अर्ज भरून घेणे, वनहक्क लाभार्थ्यांना ७/१२ चे वाटप करणे, विविध दाखले उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

शासकीय /अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह तसेच जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणार असून यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत आदिवासी महिला बचत गट स्थापन करणे, त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी त्यांना निधी व योजना, मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, आदिवासी विकास योजनांची चित्ररथाद्वारे प्रचार व प्रसिध्दी तसेच आदिवासी लाभार्थी मेळावे या सेवा संकल्प अभियानात आयोजित करण्यात येणार आहे.

या सेवा संकल्प अभियानात जिल्हात अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्क धारकांचे दावे नोंदणी तसेच सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी तालुकास्तरीय बैठकी आयोजित करण्यात येणार आहे. 





  Print






Related Photos