महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरला अटक बातम्या - Chandrapur

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरला अटक


- गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप; दवाखान्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे व सर्जिकल साहित्य आढळलेविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा-वडगाव परिसरातील मयुरी हरिदास सुपारे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप असलेल्या डॉ. विष्णू महानंद विश्वास याला पोलिसांनी अखेर रविवारी अटक केली. यापूर्वी या प्रकरणात मृत महिलेच्या पतीलाही पोलिसांनी अटक केली होती.मयुरी सुपारे यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत शेगाव (बु.) येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. या आरोपांनंतर शेगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.संयुक्त पथ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सैन्य भरतीकरीता विविध विभागांनी योग्य नियोजन करावे बातम्या - Chandrapur

सैन्य भरतीकरीता विविध विभागांनी योग्य नियोजन करावे


- अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा-  2 ते 17 ऑक्टो. दरम्यान विसापूर (ता. बल्लारपूर) येथे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यातील उमेदवारांची सैन्य भरती रॅली (अग्निवीर) विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे २ ते १७ ऑक्टोबर२०२६ या कालावधीत होणार आहे. सैन्य भरतीकरीता येणा-या उमेदवारांच्या सोयीसुविधांमध्ये आपण जिल्हा प्रशासन म्हणून कुठेही कमी पडता कामा नये, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी अतिशय सुक्ष्म नियोजन करावे, अशा सचुना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात, सैन्य भरती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे बोलत होते. पुढे ते म्हणाले, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, पोलिस विभाग, राज्य परिवहन विभाग आदीं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शिक्षकांच्या तणाव व्यवस्थापनावर वरोऱ्यात मार्गदर्शन बातम्या - Chandrapur

शिक्षकांच्या तणाव व्यवस्थापनावर वरोऱ्यात मार्गदर्शन


- इनरव्हील क्लब ऑफ वरोराचा शिक्षक दिनानिमित्त उपक्रम; मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात रंगतविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वरोरा यांच्या वतीने अरविंद निकेतन स्कूल येथे शिक्षकांसाठी तणाव व्यवस्थापन विषयावर विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला. शिक्षकांच्या व्यस्त आणि जबाबदारीच्या कार्यशैलीत मानसिक व शारीरिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमात फिटनेस ट्रेनर व न्यूट्रिशनिस्ट झैनब सॅडिकोट यांनी तणाव आणि त्याचा काम व जीवनावर होणारा परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणावाचा थेट परिणाम शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य, कार्यक्षमता आणि कौटुंबिक जीवनावरही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तणाव कमी करण्यासाठी केवळ मानसिक सकारात्मकता पुरेशी नसून, संतु...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरात बंद घर फोडून चोरी : २.५० लाखांचा ऐवज लंपास बातम्या - Chandrapur

राजुरात बंद घर फोडून चोरी : २.५० लाखांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबीय नागपूर येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि २ लाख रुपये रोख रकमेसह ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना राजुरा शहरातील किसान वॉर्ड मध्ये घडली. महेश अंबादास अरके ६२ वर्ष  सेवानिवृत्त शिक्षक हे ५ सप्टेंबर रोजी दुपारी कुटुंबीयांसह नागपूर येथे गेले होते.कार्यक्रमानंतर ते तेथेच मुक्कामी राहिले. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त आढळले. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली २ लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच पत्नी व मुलीच्या सोन्याच्या बिऱ्या आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५० हजार रुपयांचा दागिन्यांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.याप्रकरणी अरके...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
एसएनडीटी विद्यापीठ शिक्षकांच्या ऋणाची जाणीव : विद्यार्थिनींनी केला गुरूंचा सन्मान बातम्या - Chandrapur

एसएनडीटी विद्यापीठ शिक्षकांच्या ऋणाची जाणीव : विद्यार्थिनींनी केला गुरूंचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ज्ञानाची वाट दाखविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला. विद्यार्थिनींनी स्वतः पुढाकार घेत सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करून शिक्षकांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या नवीन इमारतीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यापीठाचे विविध विभाग तीन स्वतंत्र इमारतींमध्ये असल्याने प्रत्येक ठिकाणी विद्यार्थिनींनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे नियोजन केले. सजावट करण्यापासून ते स्पर्धांच्या आयोजनापर्यंतची जबाबदारी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सांभाळली.कार्यक्रमादरम्यान बलून बॅलन्स, संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंज...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूर बसस्थानकाजवळ विदेशी दारू वाहतुकीचा पर्दाफाश : LCBची धडक कारवाई बातम्या - Chandrapur

बल्लारपूर बसस्थानकाजवळ विदेशी दारू वाहतुकीचा पर्दाफाश : LCBची धडक कारवाई


- ५.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने धडक कारवाई करत ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता बल्लारपूर बसस्थानक परिसरात नाकाबंदी करून करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चंद्रपूर - बल्लारपूर - राजुरा मार्गाने विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बल्लारपूर बसस्थानक परिसरात नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या रेनॉल्ट डस्टर कार क्रं एमएच ४० एसी ९८५५ ची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली.या कारवाईत नागेश पोचणा पाकूलवार (वय ३८), रा. भेंडवी, ता. राजुरा आणि मुर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरचे काशीनाथ सिंह यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार बातम्या - Chandrapur

बल्लारपूरचे काशीनाथ सिंह यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार


- कोरोना काळातील उल्लेखनीय समाजसेवेची दखल; सन्मानामुळे बल्लारपूरचा गौरवविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने धावून जाणारे बल्लारपूर येथील काशीनाथ स्वामीनाथ सिंह यांना कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील वी द चेंज फाउंडेशन च्या वतीने आयोजित महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे बल्लारपूर शहरासह चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.कोरोना महामारीच्या काळात काशीनाथ सिंह हे स्वतः दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी नागरिकांची सेवा थांबवली नाही. २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, मोठ्या संख्येने नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेण्यासाठी सहकार्य करणे तसेच कोरोना रुग्णांना आवश्यक मद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात भव्य महिला दहीहंडीचा जल्लोष : नारीशक्तीचा उत्स्फूर्त सहभाग बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात भव्य महिला दहीहंडीचा जल्लोष : नारीशक्तीचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, बल्लारपूरच्या वतीने आयोजित भव्य महिला दहीहंडी उत्सव ५ सप्टेंबर रोजी स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राजवळ उत्साह, उमंग आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नारीशक्ती, साहस, संघटनशक्ती आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.महिला दहीहंडी स्पर्धेमुळे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक देण्यात आला. सहभागी संघांचा उत्साह वाढविण्यासाठी ३० प्रोत्साहनपर पुरस्कार...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शिक्षकांच्या कार्याचा गौरव : नगर परिषद बल्लारपूरतर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात बातम्या - Chandrapur

शिक्षकांच्या कार्याचा गौरव : नगर परिषद बल्लारपूरतर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शिक्षक दिनानिमित्त बल्लारपूर नगर परिषदेतर्फे रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृह येथे शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विविध पुरस्कार व सन्मान देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, शिक्षण सभापती प्रियंका भारत थुलकर, नियोजन सभापती पवन मेश्राम, महिला व बालकल्याण उपसभापती शिल्पा चुटे, नगरसेविका वैशाली हुमणे, अंकूबाई भुक्या, छाया मडावी, वैष्णवी जुमडे, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार तसेच शैक्षणिक गुणवत्ता सल्लागार नागेश नीत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याक संवाद यात्रा उत्साहात बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याक संवाद यात्रा उत्साहात


- शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर साधला थेट संवादविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुरात अल्पसंख्याक संवाद यात्रा उपक्रम उत्साहात पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक विश्रामगृह येथे ५ सप्टेंबर रोजी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. अल्पसंख्याक समाजाला पक्ष संघटनेशी जोडणे, तसेच शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करून समस्या शासनदरबारी मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अल्पसंख्याक ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →