महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

वेकोलि नवनिर्मित स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नाव देण्याची मागणी बातम्या - Chandrapur

वेकोलि नवनिर्मित स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नाव देण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील नवनिर्मित स्टेडियमला श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे नाव देण्यात यावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने देण्यात आलेले पत्र बल्लारपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक  ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत महाव्यवस्थापक ठाकरे यांनी स्टेडियमच्या नामकरणास सकारात्मक प्रतिसाद देत सहमती दर्शविली. तसेच मैदानाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. त्यामुळे येत्या काळात हे मैदान बालक, युवा तसेच सर्व क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणारे हे मैदान परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, येणाऱ्या पिढ्यांतील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळणार असल्याची भावना यावेळी व्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात आरोपी एलसीबीचा ताब्यात : ७० हजारांची बजाज पल्सर जप्त बातम्या - Chandrapur

चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात आरोपी एलसीबीचा ताब्यात : ७० हजारांची बजाज पल्सर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी शासकीय दूध डेअरी परिसरात करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत शुभम बिरन जाधव १८ वर्ष रा. इंदिरानगर, रेल्वे पटरीजवळ, चंद्रपूर हा चोरीचे वाहन विक्रीसाठी घेऊन शासकीय दूध डेअरी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून शुभम जाधव याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्याच्याकडून ऑरेंज रंगाची बजाज पल्सर एनएस १२५ मोटारसायकल (क्रमांक एमएच २६ सीटी ०७६०) आढळून आली. सदर दुचाकी सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा येथील पोस्टमास्तर खजूर सोनकांबळे या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी आ. सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार बातम्या - Chandrapur

बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी आ. सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार


- प्रधानमंत्री आवास योजनेतून गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गरजू व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) नागपूर येथील कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.बल्लारपूर शहरातील घरकुलांची वाढती गरज लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळावे, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. घरकुल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पोलिसांचा रूट मार्च बातम्या - Chandrapur

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पोलिसांचा रूट मार्च


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी पोळा, तान्हा पोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत सुरक्षेची सज्जता दाखवून दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च पार पडला. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस ठाणे बल्लारपूर येथून रूट मार्चला सुरुवात झाली. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी वॉर्ड, श्रीराम वॉर्ड, गांधी चौक, किल्ला वॉर्ड मार्गे गणपती विसर्जन घाटापर्यंत पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर याच मार्गाने परत येत पोलीस ठाण्यात रूट मार्चची सांगता झाली.सण-उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना शांतता व सुव्यवस्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विकसित भारत युवा नेते संवाद प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन बातम्या - Chandrapur

विकसित भारत युवा नेते संवाद प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन


- अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटपविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गजानन निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ व्हावा तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.यावेळी अमृता फडणवीस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी शिक्षणाला प्राधान्य देत आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपल्या ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.आमदार किशोर जोरगेवार ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
खड्डा जीवघेणा ठरण्यापूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी घेतली धाव बातम्या - Chandrapur

खड्डा जीवघेणा ठरण्यापूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी घेतली धाव


- राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डा पोलिस अमलदारांनी बुजविला; गोंडपिंपरी पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुकविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर रासबिहारी कॉटन जिनिंगजवळ पडलेला धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी अपघाताला निमंत्रण ठरत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा सहज लक्षात येत नसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोंडपिंपरी पोलिसांनी प्रशासनाच्या हालचालीची प्रतीक्षा न करता थेट घटनास्थळी धाव घेतली.पोलीस अमलदार अतुल तोडासे आणि मुनेश्वर रात्रे यांनी पुढाकार घेत खड्डा बुजविला. रस्त्याची दुरुस्ती करणे हे संबंधित यंत्रणेचे काम असले, तरी नागरिकांच्या जीविताला असलेला तातडीचा धोका दूर करण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून केलेली ही कृती विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील या खड्ड्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध बातम्या - Chandrapur

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध


- पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांचे आदेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयामध्ये आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि विसर्जन असे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. यात नियमांचे उल्लंघन होऊ नये, तसेच सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व कायदा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी २७ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.प्रमुख निर्बंध व नियम : यात लेझर लाईटवर पूर्ण बंदी, मिरवणुकीदरम्यान तीव्र अति तीव्रतेचे फ्लॅश लाईट व मानवी डोळयांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधिकारी/ सक्षम प्राधिकारी हे मिरवणुकीतील लाईट उपक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या विलंबाविरोधात भूमिपुत्र ब्रिगेडचा नगर परिषदेला इशारा बातम्या - Chandrapur

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या विलंबाविरोधात भूमिपुत्र ब्रिगेडचा नगर परिषदेला इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेमध्ये जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या कामकाजात होत असलेली कथित अनियमितता, नागरिकांना पावती न देणे तसेच विविध प्रशासकीय प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्याच्या प्रकाराविरोधात भूमिपुत्र ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास नगर परिषदेचा तीव्र घेराव करून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये दुरुस्ती करताना जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील तरतुदींचे पालन करण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडने केली आहे. या प्रक्रियेसाठी अन्य कोणता शासन निर्णय अथवा नियम लागू केला जात असल्यास त्याची स्पष्ट माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या कामात विनाकारण विलंब होत अ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट व डी.जे.वर निर्बंध बातम्या - Chandrapur

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट व डी.जे.वर निर्बंध


- पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या लेझर लाईट, तीव्र फ्लॅश लाईट, डी.जे. तसेच मॉडिफाइड साउंड सिस्टीमवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर किंवा अ‍ॅम्प्लीफायर वापरण्यासाठी स...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
श्रावणातील घर तिथे सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Chandrapur

श्रावणातील घर तिथे सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या घर तिथे सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला वसाहतीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या सभासदांच्या घरी हा उपक्रम राबविण्यात आला.श्रावण महिन्यात दररोज सायंकाळी ७ वाजता सभासदांच्या घरी सामुदायिक प्रार्थना घेण्यात येत होती. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत झाला.ऊर्जानगर वसाहतीतील अशोक धमाणे, विनोद ऊईके, रामदास तुमसरे, शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, बंडू कुळमेथे, विठ्ठल नन्नावरे, राजेंद्र पोईनकर, राजेश काळमेघ, बबनराव दडमल, मुरलीधर कौरासे, न...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →