चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा बैलपोळा सण तालुक्यातील विसापूर येथे पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल ७३ बैलजोड्यांनी सहभाग नोंदवत आपल्या आकर्षक सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना रंगीबेरंगी झूल, विविध अलंकार आणि पारंपरिक पद्धतीने सजविले होते. काही बैलजोड्यांवर जनजागृतीपर संदेश असलेले फलकही लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या स्पर्धेमुळे परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.उत्कृष्ट सजावट स्पर्धेत अनिकेत गिरडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंगद कष्टी यांनी द्वितीय, केतन ताजने य...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : खालसा हेल्प फाउंडेशन, गडचांदूरच्या वतीने गुरु ग्रंथ साहेबजी यांच्या प्रथम प्रकाश गुरुपर्वानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा ११ सप्टेंबर रोजी गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर येथे पार पडला. खालसा हेल्प फाउंडेशनने कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक – आमची ताकद ही संकल्पना मांडली. या माध्यमातून संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याला दिशा देणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचा गौरव करण्यात आला. हरिश्चंद्र अरोरा, पृथ्वीराज खुराना, विश्वंभर झाम, एस. रामसिंग भुरानी आणि हंसराज चौधरी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.कार्यक्रमाला खालसा हेल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष तेजिंदरसिंग दारी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुनसिंग धुन्ना, चंद्रपूर शहर अध्यक्ष पूरनसिंग जुनेजा, जिल्हा युवा अध्यक्ष गुरजितसिंग गढोक आणि विदर्भ अध्यक्ष बलबीरसिंग गुरोन यांची...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोराला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपीच्या चौकशीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रतिक धनराज झाडे (३३), रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील असून, तो दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.आरोपीच्या ताब्यात TVS कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH-34-BU-5217 आढळू...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बैल पोळा पर्वानिमित्त बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या वतीने शेतकरी बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना पोळा पर्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाला बल्लारपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राकेश सोमानी, कार्याध्यक्ष इब्राहिम जवेरी, सचिव प्रशांत मांढरे, कोषाध्यक्ष सुरेंद्र काबरा, संघटनमंत्री ज्ञानेंद्र आर्या, उपाध्यक्ष सोमेश खंडेलवाल, सहसचिव गुणवंत जीवतोडे, प्रसिद्धीप्रमुख रमेश लालवानी यांच्यासह ज्येष्ठ व्यापारी सुरेश मालू, जगदीश काबरा, रामनरेश सोमानी, राजू मुंदडा, सुनील मुथा, जय तिलोकानी, गौरव अट्टल, मयूर सांखला आणि राज भारद्वाज उपस्थित होते.यावेळी नगरसेवक सुमित उर्फ गोलू डोहने, नगरसेवक प्रणित सातपुते, नंदकिशोर सातपुते, रघुवीर सोमानी, शाहिद शेख, मीक...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या विकास प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या निधीचा थेट संबंध संस्थेच्या खात्याशी नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी, चंद्रपूरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. विकासकामे सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय व तांत्रिक देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.दीक्षाभूमी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि प्रबोधनाचे प्रेरणास्थान आहे. या स्थळाचा जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानकेंद्राच्या संकल्पनेनुसार त्य...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनी सण फ्लॅग आयर्न स्टील कोल लिमिटेडविरोधात तीव्र विरोध व्यक्त करीत बैल पोळा सणाला आंदोलनाचे स्वरूप दिले. शेती, जमीन आणि गावाच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे गदा आणली जाऊ नये, या भूमिकेतून शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलजोड्यांच्या माध्यमातून कंपनीविरोधात आपला संताप व्यक्त केला.पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा सण मानला जातो. याच पारंपरिक सणाच्या माध्यमातून नांदगाव-पोदे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडला. बैलजोड्यांना सजवून त्यांच्या अंगावर तसेच परिसरात कंपनीविरोधातील संदेश प्रदर्शित करण्यात आले. यावेळी शेती आमची, कोणाच्या बापाची नाही, गाव आमचा, अधिकार आमचा आणि जय जवान, जय किसान अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी विरोध नोंदविला.सण फ्लॅग आयर्न स्टील कोल लिमिटेडच्या प...
बातम्या -
Chandrapur
- ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती- २५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे व्यवस्थापक म्हणून मानधन तत्त्वावर काम करण्यासाठी पात्र व अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असून व्यवस्थापकास दरमहा १६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.व्यवस्थापक पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी किंवा शासकीय अथवा अशासकीय कार्यालयीन कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती पात्र राहील. अर्जदार चंद्रपूर मुख्यालयी वास्तव्यास असणे आवश्यक असून तो पदवीधारक असावा. तसेच संगणकाचे ज्ञान व एमएस-सीआयटी (MS-CIT) पात्रता आवश्यक आहे.नियुक्त व्यवस्थापकाकडे प...
बातम्या -
Chandrapur
- विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर अंतर्गत पहिली भेटविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत, प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणारे दावे व हरकती निकाली काढण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्याकरीता मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज चंद्रपूर येथे पहिली भेट दिली. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत मतदारांनी आताच आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन बिदरी यांनी केले. अंतिम यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रवाशांना व ग्रामस्थांना मार्गाची अचूक माहिती मिळावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने बल्लारपूर तालुक्यातील विसापुर येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या पुढाकारातून नांदगाव, विसापूर, बल्लारपूर आणि कोलगाव फाटा या मार्गांवर दिशादर्शक फलक बसविण्यात आले.विसापूर व परिसरातील गावांमध्ये नव्याने येणाऱ्या वाटसरूंसह वाहनचालकांना मार्गाची माहिती मिळण्यात अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा लोकोपयोगी उपक्रम राबविला.दिशादर्शक फलक बसविताना संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी श्रमदान करून सहभाग नोंदविला. योग्य ठिकाणी फलक उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक हितासाठी राबविण्यात आलेल्य...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पारंपरिक तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सजविलेल्या लाकडी बैलांच्या पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या लाकडी बैलांसह सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थिनींनी तान्हा पोळ्याचे महत्त्व तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीवर आधारित कविता, नृत्य आणि भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाला गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स, बल्लारपूरच्या प्राचार्या डॉ. अर्पणा धोटे, समाजसेविका रेणुका दुधे, वर्षा सुंचुवार, नगर सेविक...