चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुका न्यायालयासाठी निर्माणाधीन असलेल्या नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाची उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती राजनिश आर. व्यास यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. यावेळी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय के. लहोटी तसेच बल्लारपूरचे न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) शिवाजी राधू गुलावे उपस्थित होते.न्यायमूर्ती राजनिश आर. व्यास, जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय के. लहोटी आणि जेएमएफसी शिवाजी राधू गुलावे यांनी निर्माणाधीन न्यायालयीन इमारतीची पाहणी करून बांधकामाची प्रगती, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच ॲड. आणि पक्षकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयींचा आढावा घेतला.महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील न्यायालयीन इमारतींपैकी उत्कृष्ट व आधुनिक इमारतींपैकी एक म्हणून ही इमारत विकसित केली जात आहे. न्यायालयीन कामकाज सुरळीत...
बातम्या -
Chandrapur
- उत्कृष्ट सादरीकरण, संशोधनवृत्ती व आत्मविश्वासाचे दर्शन : गुणवंत कॅडेट्सचा पारितोषिक देऊन गौरवविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे सेमिनार स्पर्धा २०२६–२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण कौशल्य, शैक्षणिक तयारी, संशोधनवृत्ती, संवादकौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, संशोधन क्षमता आणि नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत कॅडेट्सना आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.स्पर्धेत बेस्ट नोट्स प्रेझेंटेशन पुरस्कार कॅडेट ईशांत बोगा यांना, तर बेस्ट प्रेझेंटेशन असिस्टंट पुरस्कार क...
बातम्या -
Chandrapur
- विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष २०२३-२४,२०२४-२५ आणि२०२५-२६ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबतची आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. महाडीबीटी १.० पोर्टलवरील महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थी स्तरावरील त्रुटींची दुरुस्ती करून संबंधित अर्ज पुनःप्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रवेशद्वार राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना महामार्गाच्या विरुद्ध दिशेने ये-जा करावी लागत असून, या मार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक पाहता भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे बल्लारपूर शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी १२ सप्टेंबर रोजी शाळा प्रशासनाला निवेदन देत महामार्गाच्या विरुद्ध दिशेला पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्याची मागणी केली.आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची वाढती ख्याती आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विवेकानंद वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, विद्यानगर वॉर्ड, शिवनगर वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड, गोकुळनगर वॉर्ड तसेच इतर परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी श...
बातम्या -
Chandrapur
- जिल्ह्यातील एकूण ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांचा याद्या पोर्टलवर अपलोड- शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील ३२ हजार ५३५ आणि आज प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील ११ हजार २६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालये, सहाय्यक निबंधक कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच याद्या तलाठ्यांनाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ३३० शेतकऱ्यांच्या खात्यात २३० क...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चंद्रपूर पोलिसांकडून शनिवारी दि १२ सप्टेंबर रोजी चंद्रापूर दशहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस विभागाने बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथून सुरू झालेला मार्च गांधी चौक, जटपुरा गेट, दवा बाजार मार्गे केवलराम चौक येथे समाप्त झाला.रूट मार्चमध्ये चंद्रपूर शहर, रामनगर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी, स्थानिक शाखा, उ...
बातम्या -
Chandrapur
- माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम- महिला सक्षमीकरणासह स्थानिक रोजगाराला चालनाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सागवान वनसंपदा आणि महिलांचे कौशल्य यांची सांगड घालून महिलांना रोजगार व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने सागवान लाकडापासून निर्मित विविध वस्तूंचे फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्य भारती, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहायक विभागीय व्यवस्थापक रुपेश पाटील, वन संरक्षण अधिकारी संभाजी कोंडेवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय ...
बातम्या -
Chandrapur
- विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४, २०२४-२०२५ आणि २०२५-२०२६ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबतची आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.महाडीबीटी १.० पोर्टलवरील महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थी स्तरावरील त्रुटींची दुरुस्ती करून संबंधित अर्ज पुनःप्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वस्ती विभागातून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याजवळ बाबुळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने फाशी घेतलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने वस्ती विभागातून विसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळील बाबुळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने फाशी घेतल्याचे आढळून आले. मृत इसमाच्या अंगावर गोल गळ्याचा टी-शर्ट व अंडरवेअर होते.मृतदेह काही काळ तेथेच असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही घटना आली.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत इसमाची...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक राजुरा क्लब सभागृहात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी काळातील पक्षसंघटनेची दिशा, जनहिताचे प्रश्न आणि विविध संघटनात्मक उपक्रमांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत SIR प्रक्रियेला गती देणे, पदवीधर मतदारांची नोंदणी प्रभावीपणे पूर्ण करणे, जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलने यशस्वी करणे तसेच बूथपातळीपासून काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या कार्यक्षेत्रात जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या प्रश्नांच्या सोडवण...