महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

एकोरी वॉर्डात पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर : युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन बातम्या - Chandrapur

एकोरी वॉर्डात पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर : युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन


- तातडीने नळ दुरुस्ती व नियमित स्वच्छतेची मागणी; कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील एकोरी वॉर्डातील सुमारे ३०० घरांच्या वस्तीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.एकोरी वॉर्डातील शासकीय नळ तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर असलेल्या हातपंपावर जावे लागत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
 आनंदवनातील आनंद-निकेतन महाविद्यालय आर्थिक संकटात : व्यवस्थापन हस्तांतरणाचा निर्णय बातम्या - Chandrapur

 आनंदवनातील आनंद-निकेतन महाविद्यालय आर्थिक संकटात : व्यवस्थापन हस्तांतरणाचा निर्णय


- जीर्ण इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी १११ कोटींची गरज; २,५०० विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सक्षम संस्थेचा शोधविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांच्या मानवतावादी कार्यातून उभ्या राहिलेल्या आनंदवनातील आनंद-निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयावर आर्थिक संकटाचे सावट आले आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून त्याठिकाणी नवीन, सुरक्षित आणि आधुनिक शैक्षणिक संकुल उभारणे आवश्यक झाले आहे. मात्र, या कामासाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम उभारणे सध्याच्या व्यवस्थापनाला शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद करण्याऐवजी त्याचा कारभार सक्षम संस्था किंवा व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महारोगी सेवा समितीने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक आणि सक्षम संस्थांकडून एक्स्प्रेशन ऑफ ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वन्यजीव निरीक्षण यंत्रणेला चोरट्यांचा धक्का : चितेगावच्या जंगलातून आठ ट्रॅप कॅमेरे चोरी  बातम्या - Chandrapur

वन्यजीव निरीक्षण यंत्रणेला चोरट्यांचा धक्का : चितेगावच्या जंगलातून आठ ट्रॅप कॅमेरे चोरी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासह प्राणी गणना व वन्यजीव संरक्षणासाठी जंगलात लावण्यात आलेले तब्बल आठ ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची गंभीर घटना चितेगाव-राजोली वनक्षेत्रात उघडकीस आली आहे. या चोरीमुळे वन्यजीवांच्या हालचालींच्या निरीक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चितेगाव येथील वनरक्षक सतीश आनंदराव नागोसे यांनी याबाबत मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांच्या आदेशानुसार उपक्षेत्र राजोली अंतर्गत चितेगाव नियतक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच प्राणी गणना व संरक्षणाच्या दृष्टीने ११ मे २०२६ रोजी एकूण आठ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांची दर १५ दिवसांनी पाहणी केली जात होती.दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सकाळी गस्तीवर असताना वनरक्षकांनी संबं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विशेष ग्रामसभेसाठी कोठारीत तरुणांचे तीन दिवसांपासून आंदोलन बातम्या - Chandrapur

विशेष ग्रामसभेसाठी कोठारीत तरुणांचे तीन दिवसांपासून आंदोलन


- ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी करूनही ग्रामसभा न घेतल्याचा आरोप; माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप व सुभाष धोटे यांचा आंदोलनाला पाठिंबाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गावातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, अशी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत कोठारी येथील तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलनाला गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तरुणांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.कोठारी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गावातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. गावाच्या विकासाकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून, नागर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरा जिल्हा बँक शाखेत पहाटे भीषण आग : सुरक्षा यंत्रणेमुळे मोठी दुर्घटना टळली बातम्या - Chandrapur

राजुरा जिल्हा बँक शाखेत पहाटे भीषण आग : सुरक्षा यंत्रणेमुळे मोठी दुर्घटना टळली


- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज , सेफ्टी ऑडिट आणि आधुनिक सुरक्षा उपाय ठरले प्रभावी घटनेनंतर काही तासांतच बँकेचे नियमित व्यवहार सुरळीतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजुरा शाखेत सोमवारी ७ पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या वेळी बँक बंद असताना आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र, बँक प्रशासनाने पूर्वनियोजित केलेली सुरक्षा व्यवस्था तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमुळे आगीचा धोका वेळीच नियंत्रित करण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.राजुरा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. शाखेत बसविण्यात आलेल्या तांत्रिक सुरक्षा यंत्रणांमुळे आगीची माहिती वेळेत मिळण्यास ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
युवा मंथन विज्ञान प्रदर्शनात बल्लारपूर पब्लिक स्कूलला तृतीय क्रमांक बातम्या - Chandrapur

युवा मंथन विज्ञान प्रदर्शनात बल्लारपूर पब्लिक स्कूलला तृतीय क्रमांक


- बायोकॉफ्टर विज्ञान मॉडेलला २१ हजार रुपयांचे पारितोषिकविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपूर येथील व्हीएनआयटी (VNIT) येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन ओपन सायन्स एक्झिबिशन मध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या विज्ञान प्रदर्शनात शाळेचे इयत्ता दहावीतील विद्यार्थी सोहम मुरकुडे व यश मल्लेवार यांनी बायोकॉफ्टर हे नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल सादर केले. या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण व स्पष्टीकरण पियुष परसुटकर या विद्यार्थ्याने केले. हा प्रकल्प शिक्षक मिकीन कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला.प्रदर्शनात प्रकल्पाची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन व प्रभावी मांडणी यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेत तृतीय क्रमांक मिळवि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
तुकूमच्या एकता चौकात दहीहंडीचा जल्लोष : गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग बातम्या - Chandrapur

तुकूमच्या एकता चौकात दहीहंडीचा जल्लोष : गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : तुकूम परिसरातील प्रभाग क्रमांक ५ मधील एकता चौक येथेगोकुळाष्टमीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. स्थानिक नगरसेवक अभिषेक डोईफोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, नगरसेवक सचिन कत्याल, नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक रवी लोनकर, नगरसेविका पुष्पा उराडे, नगरसेविका संजीवनी वासेकर, नगरसेविका सुनंदा धोबे, पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश गुंडावार यांच्यासह व्यापारी, डॉक्टर व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.उत्सवात परिसरातील बालगोपालांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. थरावर थर रचत दहीहंडी ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरात अग्निवीर भरतीचा रणशिंग : प्रशासन सज्ज बातम्या - Chandrapur

बल्लारपूरात अग्निवीर भरतीचा रणशिंग : प्रशासन सज्ज


- अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा आढावाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन बल्लारपूर  येथील तालुका क्रीडा संकुलात २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरतीच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, पोलीस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुल परिसराची संयुक्त पाहणी कर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
६ स्तरांची थरारक रचना : ३० फूट उंच दहीहंडी फोडत जय शितलामाता मंडळाची सलामी बातम्या - Chandrapur

६ स्तरांची थरारक रचना : ३० फूट उंच दहीहंडी फोडत जय शितलामाता मंडळाची सलामी


- कमल स्पोर्टींग क्लबच्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठच्या गोविंदांचा डंका , १ लाखांचे पारितोषिकविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठ येथील जय शितलामाता मंडळाने तब्बल ६ स्तरांची मानवी मनोरा रचना करून ३० फूट उंचीवरील दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. या थरारक कामगिरीने उपस्थित हजारो प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल व्यायामशाळेच्या भव्य पटांगणावर रविवार, ६ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. जय शितलामाता मंडळाच्या विजयी गोविंदांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व १ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहीर होते. आमदार किशोर जोरगे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेंबळमध्ये जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांचा छापा : चार जुगारी अटकेत बातम्या - Chandrapur

शेंबळमध्ये जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांचा छापा : चार जुगारी अटकेत


- १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; काही जुगारी पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी पसारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेंबळ येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत चार जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, रोख रकमेसह ५२ पत्त्यांची गड्डी असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.शेंबळ येथे काही जण ५२ पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळणाऱ्या काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र, चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप बालकृष्ण काले (४०, रा. पोह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →