महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त : ९० गुन्हेगारांना दोन दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश बातम्या - Chandrapur

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त : ९० गुन्हेगारांना दोन दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बल्लारपूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून शांततेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तब्बल ९० गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे.पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संबंधित व्यक्तींना बल्लारपूर शहराच्या हद्दीत प्रवेश करून वास्तव्यास राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अंतर्गत ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कुसुंबी आदिवासींच्या मोबदल्यातून २० टक्के रक्कम वसूल केल्याचा आरोप : दोघांविरुद्ध गुन्ह्याचे आदेश बातम्या - Chandrapur

कुसुंबी आदिवासींच्या मोबदल्यातून २० टक्के रक्कम वसूल केल्याचा आरोप : दोघांविरुद्ध गुन्ह्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुसुंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांना माणिकगड सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातून २० टक्के रक्कम धमकी देऊन वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारत कवडुजी आत्राम आणि आनंदराव मारू मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश कोरपना न्यायालयाने दिले आहेत.याबाबत विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी गडचांदूर पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, ते १९९७ ते २०२१ या कालावधीत तलाठी म्हणून विविध ठिकाणी कार्यरत होते. २०१२ मध्ये जिवती येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना कुसुंबी येथील आदिवासींच्या ६३.६२ हेक्टर जमिनीबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मागविली होती. संबंधित जमिनीचा वापर, भाडेपट्टा आणि खननाबाबतच्या परवानग्यांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि संबंधित महसूल ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वडिलांच्या रक्ताचे नातेही दारूसमोर हरले : पैशांसाठी मुलाने काठीने केली बेदम मारहाण बातम्या - Chandrapur

वडिलांच्या रक्ताचे नातेही दारूसमोर हरले : पैशांसाठी मुलाने काठीने केली बेदम मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दारूच्या नशेत मुलाने वडिलांकडे वगार विक्रीचे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने वडिलांच्या हातातील काठी हिसकावून त्यांच्या हातावर आणि पायाच्या मांडीवर मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, मुलाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याची गंभीर घटना सिंदेवाही तालुक्यातील चेक बामणी येथे घडली.विनायक केशव शेडमाके (७५), रा. चेक बामणी, ता. सिंदेवाही, असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर संजय विनायक शेडमाके असे आरोपी मुलाचे नाव आहे.पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विनायक शेडमाके हे पत्नीसमवेत राहून शेती करतात. त्यांना दोन मुले असून दोघांचेही विवाह झाले आहेत. लहान मुलगा संजय याला दारूचे व्यसन असून तो दारूच्या नशेत आई-वडिलांशी वारंवार वाद घालून मारहाण तसेच शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिंदेवाहीत घरफोडी : अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला बातम्या - Chandrapur

सिंदेवाहीत घरफोडी : अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही शहरातील साईनगर परिसरात घराचे कुलूप व मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भगवान कवडू मंडलवार (वय ५१) हे साईनगर येथे पत्नी, आई व मुलासह राहतात. त्यांचे सिंदेवाही येथे गुरुकृपा डेली निड्सचे दुकान आहे. ८ सप्टेंबर रोजी कामानिमित्त ते सकाळी गुरुकुंज मोजरी येथे गेले होते. दुपारी त्यांच्या आईने आपण भावाकडे मालपिरंजी येथे जात असल्याचे त्यांना फोनवरून कळविले होते. त्यानंतर घराला कुलूप लावण्यात आले होते.दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास शेजारील महिलेने मंडलवार यांना फोन करून त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूर वन प्रबोधिनीमध्ये सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक बातम्या - Chandrapur

चंद्रपूर वन प्रबोधिनीमध्ये सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख ॲड. राहुल कुल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीला विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर, विधानसभा सदस्य रईस शेख, सुलभा खोडके, संभाजीराव कोहलीकर, मोहन मते, हेमंत ओगले हे समिती सदस्य तसेच चंद्रपूर वनप्रबोधिनीचे संचालक आर. एम. रामानुजम, अपर संचालक (प्रशिक्षण ) उमेश वर्मा, वनविकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्या भारती, प्रबोधिनीच्या अपर संचालक (मुख्यालय) मनिषा भिंगे, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या, दी वाईल्ड विसडम ऑफ चंद्रमा व चंद्रमा न्युजलेटर या अंकांचे प्रकाशन करण्यात आले. अपर संचालक उमेश वर्मा यांनी चंद्र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सफाई कामगारांमुळेच समाजाचे आरोग्य सुदृढ - शेरसिंग डागोर बातम्या - Chandrapur

सफाई कामगारांमुळेच समाजाचे आरोग्य सुदृढ - शेरसिंग डागोर


- सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे कार्य करण्याच्या सूचना- नियमित आरोग्य तपासणी, विमा व किमान वेतनाची पूर्तता करा- घरकुलासाठी तातडीने आराखडा : प्रलंबित प्रश्नांसाठी नोडल अधिकारी नेमाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सफाई कर्मचारी हा समाजाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक आहे. स्वतः अनेक अडचणी आणि आरोग्यविषयक जोखमींचा सामना करून ते समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच आपल्या समाजाचे आरोग्य सुदृढ राहते. समाजाप्रती त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडवाव्यात, अशा सुचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिल्या. नियोजन भवन येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, महानगरपालिका आयुक्त अकुनू...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कॉलेजला जाते म्हणत घरातून निघाली अल्पवयीन मुलगी : चार दिवसांपासून बेपत्ता बातम्या - Chandrapur

कॉलेजला जाते म्हणत घरातून निघाली अल्पवयीन मुलगी : चार दिवसांपासून बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ‘कॉलेजमध्ये जायचे आहे’ असे सांगून घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. चार दिवसांपासून तिचा शोध सुरू असून, अखेर कुटुंबीयांनी बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता सदर मुलीने आपल्या आईकडे १०० रुपये मागितले.कॉलेजमध्ये जायचे आहे’ असे सांगून ती दप्तर घेऊन घरातून निघाली. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. सायंकाळी कुटुंबीयांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. नातेवाईक, मैत्रिणी व परिचितांकडे चौकशी करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला.दरम्यान, घरातील कागदपत्रे ठे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अवैध धंद्यांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक प्रहार : ऑगस्टमध्ये ४५९ आरोपी जेरबंद बातम्या - Chandrapur

अवैध धंद्यांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक प्रहार : ऑगस्टमध्ये ४५९ आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट २०२६ मध्ये व्यापक धडक मोहीम राबविली. दारूबंदी, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ, अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासह विविध गैरकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३७८ गुन्हे दाखल करून ४५९ आरोपींना अटक करण्यात आली असून ८० लाख ६८ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गत ३५५ गुन्हे उघडकीस आणून ५० लाख ३१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारूविरोधातही पाच कारवाया करून २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.जुगाराविरोधातील कारवाईत ८८ प्रकरणे दाखल करण्यात आली असून तब्बल १ कोटी ५ लाख ११ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध जनावरांच्या वाहतुकीविरोधात ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन : आशा स्वयंसेविकांचा सन्मान बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन : आशा स्वयंसेविकांचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी समाजाची जीवनपद्धती बदलणे अधिक गरजेचे आहे. व्यसनाधीनतेचा वाढता विळखा, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे आरोग्य हा केवळ व्यक्तीचा विषय न राहता संपूर्ण समाजाचा विषय बनला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रात आरोग्य स्वराज्य ही व्यापक लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. बल्लारपूर येथील गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृहात पहिल्या जिल्हा आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. बल्लारपूर पंचायत समिती आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बंग यांनी आरोग्य व्यवस्थेसह सामाजिक आणि पर्यावरणी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
तिकीट दिले, पैसा खर्च केला, प्रचार केला : आता सत्तेसाठी भूमिका बदलता? डॉ. दिलीप कांबळेंची खंत बातम्या - Chandrapur

तिकीट दिले, पैसा खर्च केला, प्रचार केला : आता सत्तेसाठी भूमिका बदलता? डॉ. दिलीप कांबळेंची खंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत, आर्थिक खर्च करून आणि जनतेकडे मतदानाचे आवाहन करून पाच उमेदवारांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा ‘बहुजन समता पर्व’चे मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे यांनी केला आहे. मात्र, निवडून आल्यानंतर सत्तास्थापनेच्या राजकारणात काही विजयी उमेदवारांकडून भूमिका बदलल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.डॉ. कांबळे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवरील निष्ठा आणि वैयक्तिक प्रामाणिकपणा हीच आपल्या राजकीय जीवनाची आधारभूत भूमिका असल्याचे म्हटले आहे. विविध राजकीय व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आपण सातत्याने काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.महानगर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →