अफगाणिस्तानातून भारतीयांची घरवापसी : भारतात दाखल होताच अफगाण नागरिकांना अश्रू अनावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / गाझियाबाद :
तालिबान्यांनी काबूलमध्ये कब्जा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातून भारतीयांची घरवापसी सुरु आहे. रविवारी भारतीय हवाई दलाचे  विमान एकूण 168 नागरिकांना घेऊन गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले. यापैकी 107 हे भारतीय नागरिक आहेत. भारतीय भूमीवर उतरल्यानंतर हे नागरिक भावूक झालेत. त्यांना यावेळी अश्रू अनावर झालेत. त्यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या कहाण्या सांगितल्या. सध्या या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी   एअरबेसवर केली जात आहे.
अफगाणिस्तानातून भारतात आलेले नरेंद्र सिंह खालसा यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दुःख व्यक्त करताना ते भावनिक झालेत. ते म्हणाले, मला रडायला येत आहे. जे 20 वर्षात तयार केले होते. ते आता संपले आहे. सर्व काही शून्य झाले आहे. खालसा हे अफगाणिस्तानचे संसद सदस्य होते. अलीकडेच अशी बातमी आली की तालिबानने अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू समाजाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.  Print


News - World | Posted : 2021-08-22
Related Photos