१ ऑक्टोंबर रोजी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व आधारवड जेष्ठ नागरिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे १ ऑक्टोंबर रोजी मोफतआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तन्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जिवन सुसह्य व्हावे, शारिरिक /मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दपकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक निर्गमित करण्यात आले आहे.
या धोरणातील तरतुदीनुसार, १ ऑक्टोंबर हा दिवस राज्यात जागतीक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याअनुषंगाने १ ऑक्टोंबर रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात आचार्य विनोबा भावे, ग्रामिण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथिल तज्ञ डॉक्टरांची चमु मार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय भवन, येथे सकाळी १०.०० वा. पासुन जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हजर राहून सदर आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांनी केले आहे.




Petrol Price




