महत्वाच्या बातम्या

 थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतावा योजना,व्याजात ५२ टक्के सवलत


- ३१ मार्च २०२७ पर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी संपूर्ण कर्जाची रक्कम एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजाच्या रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे.

महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या ज्या लाभार्थ्यांकडे कर्जाची परतफेड थकीत आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन व्याजातील सवलतीचा फायदा घ्यावा आणि आपले कर्ज खाते निकाली काढावे. जास्तीत जास्त थकीत कर्जदारांनी या संधीचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत बेझलवार यांनी केले आहे.





  Print






Related Photos