महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी


- सरकारी पक्षाने ७ साक्षीदार तपासले : घटनेनंतर ग्रामस्थांनीच पकडले होते आरोपीला

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटन्जी : घाटन्जी तालुक्यातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी गुरुदेव देविदास मडावी २५, रा. पार्डी नस्करी, ता. घाटंजी या आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड. संदीप दर्डा यांनी मान्डली.

ही घटना ६ मार्च २०२४ रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली होती. पीडित मुलीचे वडील शेतात मजुरीच्या कामासाठी गेले असता, पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपी गुरुदेव मडावी याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले. त्या नंतर तिला गावातील बंद असलेल्या शाळेच्या पाठीमागे  नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने आरडा ओरड केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतान्ना गावातील नागरिकांनी त्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.

वर्षातच न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावून न्याय केला -
पीडित मुलीच्या वडिलांच्या जबाबावरून घाटंजी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पांढरकवडा येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर राजेंद्र वेंजने यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपी विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान ७ साक्षीदार तपासून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. तसेच पीडितेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्याकडून नुकसानभरपाई देण्याची शिफारस केली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ADV. संदिप अ. दर्डा यांनी काम पाहिले, तर पोलीस ठाण्यातील सारीका बोधनकर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.





  Print






Related Photos