महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

 चंद्रपूर पोलीस दलासाठी ३० कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश बातम्या - Chandrapur

चंद्रपूर पोलीस दलासाठी ३० कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर पोलीस विभागाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील पोलीस विभागासाठी आरक्षित जमिनीच्या भूसंपादनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस दलासाठी डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर, प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरतीसाठी शारीरिक मैदान, बी.डी.डी.एस. प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग बट तसेच अधिकारी व अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थान उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नवीन चंद्रपूर विकास योजनेमध्ये मौजा कोसारा येथील आरक्षण क्रमांक ११० मधील ८.३० हेक्टर तसेच मौजा दाताळा येथील आरक्षण क्रमांक १३३ मधील १२.२५ हेक्टर जमीन पोलीस विभागाच्या आरक्षणाने बाधित आहे. या जमिनीचे भूसंपादन करून त्याठिकाणी पोलीस विभागासाठी विवि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार : भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी बातम्या - Chandrapur

राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार : भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांविरुद्धही एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल एफआयआरचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. राजकीय विरोधकांविरुद्ध द्वेषभावनेतून...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वाघोबाच्या चरणी आता जलधारा! आ.सुधीर मुनगंटीवारांच्या तत्परतेने बोअरवेलचा मार्ग मोकळा बातम्या - Chandrapur

वाघोबाच्या चरणी आता जलधारा! आ.सुधीर मुनगंटीवारांच्या तत्परतेने बोअरवेलचा मार्ग मोकळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी /  बल्लारपूर : विसापूर-कोलगाव मार्गावरील पाटणकर-हिवरे व पोहाणे परिवाराचे आराध्य दैवत असलेल्या वाघोबा मंदिर परिसरात बोअरवेल उपलब्ध करून देण्याची मागणी आता मार्गी लागली आहे. भाविक, शेतकरी तसेच आगामी धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही मागणी करण्यात आली होती.भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार यांच्या माध्यमातून गजानन पाटणकर व जनार्धन पाटणकर यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मंदिर परिसरात बोअरवेल खोदून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.या आदेशानुसार महाराष्ट्र जलवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत मंदिर परिसराची प्रत्यक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत विनापरवाना भरमार बंदूक घेऊन फिरणारा जेरबंद बातम्या - Chandrapur

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत विनापरवाना भरमार बंदूक घेऊन फिरणारा जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी /  चंद्रपूर : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असतानाच विनापरवाना भरमार बंदूक घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला ब्रम्हपुरी पोलिसांनी जेरबंद केले. मेंडकी ते गणेशपूर मार्गावरील स्मशानभूमीजवळ रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून सुमारे १२ हजार रुपये किमतीची भरमार बंदूक जप्त करण्यात आली.गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान एक इसम अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन मेंडकी ते गणेशपूर मार्गाने पायी जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अंबरसिंग बच्चनसिंग दुधानी ४० वर्षे रा. रूपाळामेंढा/आकापूर, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर असे सांगितले.झडतीदरम्यान त्याच्याकडे लाकडी बनावटीची भरमा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूर भूमिगत खाणीत इंटकची नवी टीम : मोतीलाल वर्मा अध्यक्ष, चेतन गेडाम सचिव बातम्या - Chandrapur

बल्लारपूर भूमिगत खाणीत इंटकची नवी टीम : मोतीलाल वर्मा अध्यक्ष, चेतन गेडाम सचिव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ (इंटक)च्या बल्लारपूर भूमिगत खाण शाखेच्या सन २०२६-२०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या मुख्यालयाकडून ९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे पत्र जारी करण्यात आले असून, नवनिर्वाचित कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने कार्यरत झाली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी मोतीलाल वर्मा, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत पिंपळकर, तर उपाध्यक्षपदी रामराज निषाद, दिलीप ठाकरे, सर्वणलाल रामभुवन आणि नितेश नगराळे यांची निवड करण्यात आली आहे.सचिवपदी चेतन गेडाम, संयुक्त सचिवपदी आशिष कुमार सिंह, सुबोदिप भोमिक, राजू शेंडे आणि श्रीधर रावला, तर संघटन सचिवपदी दिलीप टोपो, कमलेश श्रीवास, सुनील बहुरिया, साईनाथ गोहणे, विजय चंद्रया आणि हृषभ वर्मा यांची निवड झाली आहे. रवीकुमार राऊत यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
एसडीओ कार्यालयावर धडकला शेतकरी-कष्टकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा बातम्या - Chandrapur

एसडीओ कार्यालयावर धडकला शेतकरी-कष्टकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा


- धानाला बोनस, सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्या; बैलगाड्या व ट्रॅक्टरसह शेतकरी-कष्टकरी रस्त्यावरविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि निराधारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मंगळवारी ८ ब्रह्मपुरी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारक, वडसा रोड येथून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांसाठी शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने मोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.किसान सभा जिंदाबाद, शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण ब्रह्मपुरी शहर दणाणून गेले. शेतकरी नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी बैलगाड्या व ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नागपुरातून दुचाकी चोरून चंद्रपुरात आणली : कोब्रा व यमला एलसीबीच्या जाळ्यात बातम्या - Chandrapur

नागपुरातून दुचाकी चोरून चंद्रपुरात आणली : कोब्रा व यमला एलसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : नागपूरमधून दुचाकी चोरून ती चंद्रपुरात आणल्यानंतर शहरात फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर आणि यमला तंगराज कोरवान दोन्ही रा. इंदिरा नगर चंद्रपूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली.दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातील मोटारसायकलची तपासणी केली असता ती नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल आहे. जप्त करण्यात आलेली MP-२०-MH-८१३५  क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपुरात भव्य सायकल रॅली बातम्या - Chandrapur

स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपुरात भव्य सायकल रॅली


- विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ हवा–निरोगी जीवनचा संदेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत स्वच्छ वायू दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ हवा–निरोगी जीवनचा संदेश देत खालसा स्कूल तसेच महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, पंचबुद्धे, अमोल शेळके, संतोष गार्गेलवार, कुशल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायकल रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती केली. सायकल चालवा, प्रदूषण टाळा, ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ब्रम्हपुरीत अवैध देशी दारू वाहतुकीवर एलसीबीचा छापा : ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

ब्रम्हपुरीत अवैध देशी दारू वाहतुकीवर एलसीबीचा छापा : ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अवैध देशी दारूसह दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.८ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुडेसावली परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी कारमधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४० पेट्यांमध्ये ९० मिली क्षमतेच्या एकूण ४ हजार सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किमतीची फोर्ड फिगो कार क्रं एमएच ३१ बीके ९२४२ जप्त करण्यात आली....

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जव्हेरी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे बातम्या - Chandrapur

जव्हेरी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालिका प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे चंद्रपूर पोलीस विभाग व पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जनजागृती रथातील प्रोजेक्टरच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती आणि महिला संरक्षण या विषयांवर माहितीपर व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. पोलीस हवालदार बळीराम पवार व पोलीस अंमलदार नागेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस हवालदार प्रवीण रामटेके, पोलीस अंमलदार अभिषेक आडे तसेच मार्शल आर्ट प्रशिक्षक वाजिद अली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देण्यात आली. मार्शल आर्टचे विद्यार्थी साक्षी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →