महत्वाच्या बातम्या

 महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेच्या विचारांना अभिवादन : मानवतेच्या रक्षणाचा संकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चंद्रपूर शहराच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, समता आणि सामाजिक सलोख्याच्या विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प केला.

सत्य, अहिंसा आणि नैतिक मूल्यांच्या बळावर समाजपरिवर्तनाची दिशा दाखविणारे महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांनी स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या गांधीजींच्या विचारांचे स्मरण त्यांच्या जयंतीदिनी करण्यात आले.

समता, बंधुता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावावर आधारित समाजनिर्मितीचे गांधीजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. समाजात शांतता, एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत मानवता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

गांधीजींनी दिलेला सत्य आणि अहिंसेचा संदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो सामाजिक जीवनात रुजविण्याची गरज आहे. जात, धर्म आणि पंथाच्या भिंती दूर करून सर्वांना समानतेने आणि बंधुभावाने जोडणारा समाज निर्माण करणे हीच गांधीजींना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, माजी गटनेते संजय वैद्य, महिला शहर जिल्हाध्यक्ष नंदिनी गौरकार, युवक जिल्हाकार्याध्यक्ष संजय ठाकूर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, आदिवासी सेल शहर जिल्हाध्यक्ष जाणार्धन गेडाम, कामगार सेल शहर जिल्हाध्यक्ष महेश काहीलकर, शहर उपाध्यक्ष आनंद तिरानकर, शहर सरचिटणीस दिलीपभाऊ आत्राम, शहर सचिव शोभा घरडे, सोनाली साखरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






Related Photos