स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध उद्योजकांना १५ टक्के मार्जिन मनीचा लाभ


- पात्र उद्योजकांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के मार्जिन मनी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेने प्रकल्प मूल्याच्या किमान ७५ टक्के कर्ज वितरित करणे आणि लाभार्थ्याने किमान १० टक्के स्वहिस्सा भरणे आवश्यक आहे. मंजूर मार्जिन मनीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल. या रकमेचा वापर केवळ मंजूर प्रकल्पाच्या मुदत कर्ज व खेळत्या भागभांडवलासाठी करणे बंधनकारक आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्जदाराने यापूर्वी उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा. तसेच आवश्यक कागदपत्रे, बँकेचे शिफारसपत्र आणि ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील सत्यतेचे शपथपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून मार्जिन मनीचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बी-विंग, सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआयसमोर, श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.




Petrol Price




