महत्वाच्या बातम्या

 टेकला येथे क्रांतिवीर शहीद वीर बाबूराव शेडमाके यांचा १६९ वा शहीद दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : ग्रामपंचायत टेकला अंतर्गत वीर बाबूराव शेडमाके सेवा समिती, टेकला यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रांतिवीर शहीद वीर बाबूराव शेडमाके यांचा १६९ वा शहीद दिन मोठ्या उत्साहात आणि आदिवासी परंपरेनुसार साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भूमका दादाजी कुसराम, भामरागड यांनी आदिवासी पद्धतीने विधीवत पूजन करून केली. यानंतर शहीद वीराच्या स्मारकास पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोंडी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.याप्रसंगी संस्थापक वंगा दादा वेलादी (ग्रामपंचायत अधिकारी, टेकला) यांनी शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या जंगोम दलाच्या लढ्यावर आणि वयाच्या २५ व्या वर्षी दिलेल्या बलिदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

उपसरपंच बुकलू गोंगलू लेकामी आणि भूमका दादाजी कुसराम यांनी देखील समाज प्रबोधनावर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सम्मा कुळयामी, मंगला दुर्वा, सेवा समितीचे अध्यक्ष मधुकर रैणू दुर्वा, सचिव दुलसा दुर्वा, उपाध्यक्ष बाजू फेका दुर्वा, सहसचिव वंजा चैतू कोवासी, कार्याध्यक्ष पांडू मादी बोगामी यांच्यासह सल्लागार मंडळ, बचत गटाच्या महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन  किशोर दुर्वा यांनी केले होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.





  Print






Related Photos