जादूटोणा केल्याच्या संशयावरुन वृद्ध आणि महिलांना मारहाण : १२ जणांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरुन 7 जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केली. यामध्ये 4 महिला आणि 3 वृद्धांचा समावेश आहे.. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्वांची सुटका केली. सातपैकी पाच जणांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत. गावातील नागरिक मारहाणीत सहभागी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या घटनेला अनेक पदर असल्याचे  सागंण्यात येत आहे. गेली अनेक वर्ष हे कुटुंब जादूटोणी करत होते. संपूर्ण ग्रामस्तांचा त्यांच्यावर संशय होता. त्यामुळे कुटुंबाला तेलंगणा येथे पाठवण्यात आले. पण मेहरमच्या आसपास हे कुटुंब परत आले. त्यानंतर या कुटुंबाने पुन्हा जादूटोणा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ग्रामस्थांनी कुटुंबाला मारहाण केली. तेव्हा कोणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सध्या 12 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. प्रकरणातील गुन्हेगारांना काय शिक्षा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-08-23Related Photos