टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण भालाफेक : सुमित अंतिलने जिंकले सुवर्णपदक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अगदी सुवर्णमय ठरत आहे. भारताने सकाळपासून स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधी हे भारताचे दुसरे सुवर्णपदक असून आज सकाळीच महिला नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकल होते. 
सुमितने सुवर्णपदक जिंकलेल्या स्पर्धेत एकवेळा नाही, दोनवेळा नाही तर तीन वेळा स्वत:चच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्ना सुमितने पहिला थ्रो 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवे वर्ल्ड रेकॉर्डही सेट केले.  Print


News - World | Posted : 2021-08-30
Related Photos