शिवनाळा येथे श्री गुरुदेव गणेश उत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : उपकेंद्र वलनी अंतर्गत श्री गुरुदेव गणेश उत्सव मंडळ, शिवनाळा येथे आज भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष देवराम खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या औचित्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांची उच्चरक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes), कान-नाक-घसा (ENT), तोंडाची तपासणी (Oral Checkup) तसेच इतर किरकोळ आजारांची सखोल तपासणी करून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला व औषधोपचार पुरवण्यात आले.
या शिबिरात उपकेंद्र वलनी येथील आरोग्य पथकाने मोलाचे योगदान दिले. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. पल्लवी हाडके, आरोग्य सेविका रोहिणी शहारे, आरोग्य सेवक रोहित निंबाळकर तसेच आशा स्वयंसेविका प्रमिला देशमुख व शेवंता ढेंगरे यांनी उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबिराचा ग्रामस्थ व भाविकांनी लाभ घेतला.




Petrol Price




