महत्वाच्या बातम्या

 वैभव कॉन्व्हेंटमध्ये तान्हा पोळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पारंपरिक तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सजविलेल्या लाकडी बैलांच्या पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या लाकडी बैलांसह सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थिनींनी तान्हा पोळ्याचे महत्त्व तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीवर आधारित कविता, नृत्य आणि भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाला गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स, बल्लारपूरच्या प्राचार्या डॉ. अर्पणा धोटे, समाजसेविका रेणुका दुधे, वर्षा सुंचुवार, नगर सेविका वैशाली हुमने, प्रा.डॉ. ज्योत्सना खोब्रागडे, वैभव कॉन्व्हेंट स्कूलचे संस्थापक हेमंत मानकर, संचालिका रजिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या फरजाना शेख, शबिस्ता सैयद, पालक प्रतिनिधी सोनी मेहरोलिया, भावना जवादे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्या डॉ. अर्पणा धोटे,  रेणुका दुधे आणि नगर सेविका वैशाली हुमने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय संस्कृती व परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहावे, असे आवाहन करत सर्वांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

उत्कृष्ट लाकडी बैल सजावट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापनातर्फे उपहार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मोनिका बुराडकर, अनीता देवईकर आणि प्रणाली गोरघाटे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षिका वनिता रंगारी यांनी केले.





  Print






Related Photos