आरमोरी येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेश मंदिर


आरमोरी येथील नेहरू चौकात एकमेव गणपती मंदिर आहे दरवर्षी येथे गणेश चतुर्थीला गणपती उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो . सन १९४५ मध्ये आरमोरी येथील काशिनाथ बेलदार यांच्या स्वप्नात गणपतीची मूर्ती जमिनीत आहे असे दिसायचे त्यामुळे येथील नागरिकांनी प्रत्यक्ष जमीन खोदली असता जमिनीतून गणपतीची मूर्ती निघाली आणि त्यानंतर बालाजी हेमके, जनार्धन हेमके, दामोदर हेमके यांच्या पुढाकाराने कवेलूचे मंदिर बाधण्यात आले आणि गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर नरसिंग गहेरवार यांच्या आर्थिक मदतीने सिमेंट कोन्क्रेंटचे मंदिर बांधण्यात आले आणि त्यानंतर दिलीप हेमके, राजेश जोध, राजू अंबानी, दिलीप चिलबुले, दिपक हेमके, बापू पप्पुलवार, संजय हेमके, वामन देवीकार, हरिभाऊ तिजारे यांच्या मदतीने मंदिर सुशोभित करण्यात आले आहे
गणेश चतुर्थीला दरवर्षी श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्या मदतीने या मंदिरात गणपती मूर्तीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी आनंद मेळावा तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. उत्सवाच्या यस्वीतेसाठी अक्षय हेमके, चंदू आकारे, नितीन जोध, प्रफुल मोगरे, योगेश देविकार, आकाश हेमके, सुरज हेमके, गणेश तिजारे, सौरब हेमके, अमर हेमके, सुरेश हेमके, स्वप्नील हेमके, इत्यादीचे सहकार्य लाभात आहे.
News - Editorial | Posted : 2021-09-10