भंडारा येथील नागरीकांचा मरनोत्तर देहदानाचा प्रेरणादायी संकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : समाजहीताची जाणीव आणि वैद्यकीय शिक्षणाला हाथभार लावण्याच्या उददेशाने भंडारा शहर येथील रहीवासी प्रसन्नकुमार कवरलाल जैन, ७३ वर्ष राहणार आझाद वार्ड मेन रोड भंडारा यांनी मरनोत्तर देहदानाचा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे यांनी मरनोत्तर देहदानासाठी संकल्प पत्र भरुन आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली
मरनोत्तर देहदान हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असुन विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचनेच्या प्रत्यक्ष अभ्यास करण्यास त्याचा मोठा उपयोग होतो त्यामुळे भविष्यातील डॉक्टरांचा ज्ञानवृद्ध्दीसोबतच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासही मदत होते या उपक्रमातुन नागरीकांनी मृत्युनंतर समाजाच्या उपयोगी पडावे हा मानवतावादी संदेश दिला आहे देहदानाचा संकल्प हा केवळ व्यक्तीगत निर्णय नसुन समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि पुढील पिढीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी दिलेले अमुल्य योगदान आहे.
अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थेतील वरीष्ठ समाजसेवा अधिक्षक व ऑर्गन ट्रांन्सप्लांट कोऑर्डीनेटर अरविंद शंभरकर यांनी कुवरलाल जैन यांच्या राहते घरी जावुन संकल्प पत्र स्वीकारण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा प्रशासनाच्या वतीने मरनोत्तर देहदानाच्या संकल्प प्रसन्नकुमार कवरलाल जैन, यांचे अभिनंदन करण्यात आले.




Petrol Price




