जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कोषागार कार्यालय येथे १३ ऑक्टोंबर ला जिल्हा निवृत्तीवेतनधारक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, निवृत्तीवेतनधारक व बँकेचे पदाधिकारी यांचे संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणीचे समाधान करण्यात आले.
निवृत्तीवेतनधारकांकरीता बँकेमध्ये स्वतंत्रय काउंटर असणे, आयकर, जिवन प्रमाणपत्र, विमाछत्र विमा योजना, सुधारीत निवृत्तीवेतन, अशा विविध विषयावर चर्चा झाली. सदर मेळाव्यात जिल्हा कोषागार अधिकारी, लक्ष्मण लिंगालोड, अप्पर कोषागार अधिकारी, दिपक उके, जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डब्युिं.एस.जुवारे, जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव एस.ए.मांडवगडे, गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंटल को-ऑप बँकेचे शाखा व्यवस्थापक, अलमपटलावार, निवृत्तीवेतन शाखेचे कर्मचारी, प्रवीण सोनवणे, माया मामीडवार, दिगंबर मानकर व निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
News - Gadchiroli